कराड : विटा रस्त्यावरील कृष्णा नदीवर बांधण्यात येणार्या नवीन पुलाच्या कामासाठी जुन्या कृष्णा पुलावरील वाहतुक बंद करून हा पुल पाडण्यात येणार असल्याचा सुचना फलक कृष्णा नाक्यावर लावला आहे. पुढच्या आठवडयापासुन जुन्या पुलावरील वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे.

पूर्वीचा राज्य महामार्ग असलेल्या गुहागार – विजापुर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्यानंतर या महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. सध्या कराड ते नागज फाटा दरम्यानच्या रस्त्याच्या विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. याचे कामांतर्गत येथील कृष्णा नदीवर पुर्वीचे दोन पूल आहेत. मात्र यातील जुना पूल कमकुवत झाल्याने या ठिकाणी नवीन पूल बांधण्यात येत आहे. सध्या असलेल्या दोन पुलांच्या मध्ये नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे. एकुण 9 पिलर पैकी 6 पिलारचे काम पुर्णत्वाकडे आले आहे. मात्र पुलाच्या सुरूवातीचे दोन पिलर उभारण्यासाठी वहातुकीचा अडथळा होत असल्याने जुन्या पुलावरील वाहतुक बंद करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. त्यानुसार पुढच्या आठवडयापासुन जुन्या पुलावरूनप वाहतुकग बंद करून ानवीन पुलावरून दुहेरी वाहतुक सुरू करण्यात येणार आहे.
याबाबत कृष्णा नाका येथे ठेकेदारी कंपनीच्या वतीने सूचना फलकही लावला आहे. यानंतर आवश्यकतेनुसार जुना पुल तोडण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापनाकडुन देण्यात आली.

