मेढा प्रतिनिधी – .सातारा जिल्ह्यातील एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये यासाठी कर्ज वाटपाच्या प्रचलित सूत्रात बदल करीत केळघर शाखेतून विकास सेवा सोसायटी मार्फत या वर्षीच्या हंगामातील संकरीत भात सबल आणि दुर्बल ४७३शेतकरी सभासदांना ०१ कोटी ५७ लाख २८ हजार रुपये पीक कर्जाचे वाटप करण्यात येणार असून या पिककर्ज वाटपाचा पहिला चेक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या केळघर शाखेतून विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रामभाऊ शेलार यांच्या हस्ते शेतकऱ्यांना देण्यात आला.
या कार्यक्रमाच्या वेळी केळघर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रामभाऊ शेलार,मा.चेअमन हरीभाऊ शेलार,जिल्हा बँकेचे मॅनेजर सुर्यकांत चिकणे,संचालक एम.एस.पार्टे, मा.सरपंच चंद्रकांत बेलोषे,संचालक दिलीप पाटील,सचिव आनंदा शेलार,सह सचिव नंदकुमार पाटील,मा.सरपंच बाजीराव सुर्वे,युवा उद्योजक शशिकांत शेलार,नामदेव शेलार,उद्योजक लक्ष्मण जाधव,उपसरपंच सागर पार्टे,शंकर बिरामणे यांच्यासह सोसायटीचे सभासद, विभागातील शेतकरी,विकास सेवा सोसायटीचे सभासद आणि जिल्हा मध्य.सह. बँक केळघरचे शाखाप्रमुख सूर्यकांत चिकणे आणि कर्मचारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये पीक कर्ज वाटप केले जाते.शेतकरी बांधवांना आपल्या शेतात पीक घेण्यासाठी,बियाणे किंवा त्यामध्ये खत घेणे यासाठी पिक कर्ज अशा विविध बाबींसाठी शेतकरी बांधव ही कर्ज घेत असतात,सोसायटीचे सर्व सभासद तसेच शेतकऱ्यांना सर्वतोपरी सहकार्य करू असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या वेळी केळघर विकास सेवा सोसायटीचे चेअरमन रामभाऊ शेलार यांनी केले.
शेतकऱ्यांना स्वस्त दरात सुरळीत कर्ज पुरवठा करण्याला प्राधान्य आहे. त्यालाच अनुसरून शेतकर्यांसाठी जिल्हा बँकेचे मार्फत किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे.जावली तालुक्यातील विकास सेवा सोसायटीच्या ज्या सभासदांनी पीक कर्ज घेतले नाही,अशा सभासदांनी विकास सेवा सोसायटीशी संपर्क करून पीक कर्ज प्राप्त करून घ्यावे,असे आवाहन जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी केले आहे.