पाटण:- (शंकर मोहिते)- पाटण तालुक्यातील केरा नदीच्या खोऱ्यात बुधवार दि. १६ जून ची रात्र सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी काळ रात्र ठरली. पाटणच्या उत्तरेकडील केरा विभाग बुधवारी रात्री झोपेत सुन्न असताना पाऊसाचा मात्र हाहाकार सुरु होता. अवघ्या पाच तासाच्या फरकात ढगफुटी झाली. या ढगफुटीची भयानकता ऐवढी भयंकर होती की एका रात्रीत होत्याचे नव्हते झाले. सकाळ उठून प्रत्येकाची दादंल शेताकडे वळली पहातो तर काय शेतच जाग्यावर उरले नाही. अशी परिस्थिती नजरेसमोर आली. आयुष्यभराची मैहीनत ढगफुटीच्या पाण्यातून वाहून गेली होती. अशा परस्थितीत सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मात्र शेखरसिंह रविवारी वर्षा सहलीचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासोबत कोयनेला आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी फिरण्यास बंदी असताना कोयनेच्या निसर्गाने मात्र जिल्हाधिकारी शेखरसिंह यांना भुरळ पाडली. त्यांनीच घातलेली आचारसंहिता मोडून त्यांनी कोयनेच्या पर्यटनाचा मनमुराद आनंद कुटुंबिया सोबत घेतला. आणि कोयनेच्या पाऊसात ते ओलेचिंब झाले. या पर्यटनाच्या आनंदात जिल्हाधिकारी पाटण तालुक्यात झालेल्या ढगफुटीच्या नुकसानीत भरभरठलेल्या शेतकऱ्यांना मात्र भेटण्यास विसरून गेले.
या ढगफुटीने केरा नदीच्या खोऱ्यातील शेतकरी पुर्ता घायाळ झाला आहे. उभ्या आयुष्यात पाहिली नाही ऐवढी मोठी ढगफुटी त्या रात्री झाली. आख्ख केरा नदीच खोर दि. १६ बुधवारी मध्यरात्री गाड झोपेत असताना पाऊसाच्या सरीवर सरी घरावर कोसळत होत्या. रात्री आठ वा.नंतर सुरु झालेल्या पाऊसाने अकरा नंतर रुद्र रुप धारण करण्यास सुरुवात केली. पहाटे चार वा. पर्यंत पडलेल्या या महाभयंकर पाऊसाने आपला प्रताप दाखविला. सगळ्या रानावनातून पाणीचपाणी झाले. ओढे नाले तुडुंब भरली. वाट मिळेल तिकडे पाणी वाहत होते. या पाण्याने शेतांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत होते. शेती वाहून जात होती. पिकांची नासाडी होत होती. कोणाच्या घरात पाणी शिरत होते तर कोणाच्या गोठ्यात पाणी शिरत होते. एकाच वेळी महाभयंकर परस्थितीचे उध्दभवलेले रुद्ररुपाने केरा नदीचे पात्र गाठले आणि प्रथमच आतापर्यंतच्या काळात नदीने कधीनाही तेवढे रुद्ररुप धारण केले. म्हणतात वेळ आली होती पण काळ आला नव्हता या म्हणीप्रमाणे ही ढगफुटी दिवसाची झाली असती तर वित्त हानीपेक्षा जिवीत हानी मोठ्या प्रमाणात झाली असती. कारण खरीप हंगामाचा काळात सगळीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात शेतात, रानावनात गुरांच्या पाठीमागे असतात. या ढगफुटीत रानातील गुरेढोरे, शेतातील शेतकरी वाहून जाण्याची शक्यता निर्माण झाली असती.
अशा परस्थितीत ढगफुटीने नुकसान झालेल्या शेतात शेतकरी आस्व ढाळत आसताना बुधवार नंतर गुरवार, शुक्रवार या दोन दिवसात कोणीही प्रशासन, लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर पोहचला नाही. शनिवारी दि.१९ रोजी ढगफुटीतील नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई साठी विक्रमबाबा पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरुन आंदोलन करु लागला. तेंव्हा मंत्री, लोकप्रतिनिधी, नेते, पुढारी, प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करु लागले. आणि रविवारी दि.२० रोजी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी शेखरसिंह कुटुंबियांसोबत कोयनेच्या पाऊसात वर्षा सहलीचा आनंद घेत होते. कोयनेला जाता – येताना त्यांनी रस्त्यावर असणाऱ्या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याची तस्ती देखील घेतली नाही. हेच आश्चर्य पाटण तालुक्यातील शेतकऱ्यांना जिल्हाधिकारी यांच्या बाबतीत वाटून राहिले आहे.