सातारा: सातारा जिल्ह्याचा 2019-2020 या आर्थिक वर्षाचा 7800 कोटी रुपयांचा वार्षिक पत आरखड्याचे लोकार्पण जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी त्यांनी बँकांनी जिल्ह्याच्या उद्दीष्ठपुर्तीची परंपरा कायम ठेवावी, असे सांगितले
याप्रसंगी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनिल बोरकर, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अविनाश फडतरे, रिझर्व्ह बँकेच सुरज पोंक्षे, नाबार्डचे सहायक सरव्यवस्थापक सुबोध अभ्यंकर, बँक ऑफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक वसंत गागरे, अग्रणी बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जनरल मॅनेजर एस. एन. जाधव, सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व शासकीय विभागाचे प्रमुख यांची उपस्थिती होती.
जिल्ह्यातील सर्व बँकाच्या कामकाजा बाबत जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी समाधान व्यक्त करून नविन पत आरखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व बँकानी सुरुवाती पासूनच प्रयत्न करण्यात यावे असे सांगीतले. आगामी काळात औद्योगिक विकासात सातारा जिल्ह्याचे स्थान महत्वाचे राहणार असल्याचे बँकानी लक्षात घ्यावे. बँका लघु उद्योगांना कर्ज पुरवठा करत आहेत. मात्र मोठे उद्योग जिल्ह्यात येण्यासाठी कर्ज पुरवठा व इतर सुविधा देवून बँकांनी त्यांच्या मागे खंबीर उभे रहावे. पीक कर्ज वाटपाला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून हे उद्दिष्ट 2900 कोटी रुपये आहे. खरीप हंगामासाठी 1920 कोटी तर रब्बी हंगामासाठी 980 कोटीचे उद्दिष्ट आहे. पिककर्ज वाटपासाठी जिल्हातील सर्वच बँकानी जास्तीत जास्त शेतीकर्जवाटपासाठी मेळावे आयोजीत करावेत व उद्दीष्ठपुर्ती करावी, असेही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी सांगितले.
पत आरखडा 7800 कोटी – राज्य अग्रणी बँक समितीने मंजूर केलेल्या जिल्ह्याच्या वार्षिक पत आरखड्यात अग्रक्रम क्षेत्रासाठी 7000 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. त्यात कृषी व कृषीपूरक क्षेत्रासाठी 3600 कोटी, लघु उद्योगांसाठी 400 कोटी आणि अन्य प्राथमिकता क्षेत्रासाठी 2600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गैर प्राथमिकता क्षेत्रासाठी 800 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
बँकांनी जिल्ह्याच्या उद्दीष्ठपुर्तीची परंपरा कायम ठेवावी: जिल्हाधिकारी श्वेता सिंघल
RELATED ARTICLES