वडूज: येथील वाकेश्वर रस्त्यावरील शिवम् मित्र मंडळाने सलग 24 व्या वर्षी जीवंत देखाव्याची प्रथा कायम राखली आहे. चालू वर्षी या मंडळाने शिरस्ता शिवशाहीचा हा पाऊन तासाचा ऐतिहासिक जिवंत देखावा सादर केला आहे. हा देखावा पाहण्यासाठी रात्री 9 ते 12 या वेळेत प्रेक्षकांची चांगली गर्दी होत आहे.
मंडळाचे संस्थापक व माजी ग्रापंचायत सदस्य विनायक खाडे यांनी या देखाव्याचे दिग्दर्शन केले आहे. या देखाव्यात शिवकालीन ऐतिहासीक प्रसंग दाखविण्यात आला आहे. त्याचबरोबर चालू परस्थितीतील तरुणाईच्या वागण्यावर विडंबन सादर केले आहे. देखाव्यामध्ये आण्णा तुपे यांनी शिवाजी महाराजांची तर कु. पुजा मखरे हिने राणी सावित्रीबाईची भुमिका उत्कृष्टपणे रेखाटली आहे.
याशिवाय शुभम राऊत, कृष्णा एकांडे, प्रज्वल खाडे, दिप्ती खाडे, निलेश आवळे, सचिन लोहार, डॉ. संदिप बिस्वास, अक्षय काटकर, विक्रम काळे, विशाल यादव, साहिल बागवान, प्रकाश आवळे यांनीही आपापल्या परीने भूमिका जीवंत करण्याचा प्रयत्न केला आहे.
मंडळाचे अध्यक्ष निलेश आवळे, माजी अध्यक्ष डॉ. संतोष देशमुख, गजानन राऊत, संजय मखरे आदिंसह कार्यकर्ते देखावा व गणेशोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशील आहेत.
शिवम्चा जीवंत देखावा पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी
RELATED ARTICLES