वाई : श्री. छ. कल्पनाराजे भोसले यांनी आज वाईतील धर्मपुरीमधील जैन समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी संपूर्ण समाजाच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार जैनबांधवांनी बोलून दाखविला.
लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व मित्रपक्षांचे उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ श्री. छ. कल्पनाराजे भोसले आज वाईला आल्या होत्या. यावेळी त्यांनी स्थानिक नेत्यांच्या व प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी धर्मपुरीतील जैन मंदिरात जैन समाजाच्यावतीने कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते.
श्री. छ. कल्पनाराजे भोसले म्हणाल्या, उदयनराजेंना समाजातील सर्वस्तरातून पाठिंबा मिळत आहे. ते जनतेचे राजे आहेत. त्यांच्याबद्दल लोकांच्यामनात आपुलकीची भावना आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याची रॅली एवढी प्रचंड होती की ती विजयी रॅली असल्याचा भास होत होता. विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्देच नसल्याने ते उलटसुलट आरोप करीत आहेत.
महाराजांनी प्रत्येक तालुक्यांमध्ये विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांना उदयनराजे पितृतूल्य समजतात. उदयनराजे जनता हीच आपली दौलत आहे असे माणतात.
उदयनराजेंची उमेदवारी ही सर्वसामांन्यांसाठी आहे. त्यामुळे आपले प्रेम असेच वृध्दींगत होण्यासाठी घडाळयासमोरील बटन दाबून उदयनराजेंना मताधिक्याने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नगरसेवक दिपक ओसवाल यांनी प्रास्ताविक केले व आभार मानले. यावेळी पोपटलाल ओसवाल, अॅ्ड. श्रीकांत चव्हाण, नगरसेवक भारत खामकर, विकास शिंदे, अॅपड. शांतीलाल ओसवाल, हिराशेठ जैन, सुनिल बनकर, चंपक ओसवाल, मियाचंद ओसवाल, अश्विलनी पुजारी, जयश्री ओसवाल यांच्यासह जैन समाज बांधव व महिला उपस्थित होत्या.
वाईतील जैन बांधवांशी राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी साधला संवाद
RELATED ARTICLES

