म्हासुर्णे ( प्रतिनिधी तुषार माने) :- एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प खटाव यांच्या वतिने म्हासुर्णे येथील अंगणवाडीत पोषण पंधरावडा कार्यक्रम म्हासुर्णे सरपंच सचिन माने यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,निमसोड बिटच्या प्रमुख कुंभार मँडम,पुसेसावळी बिट प्रमुख गायकवाड मँडम,मोरे मँडम यांच्या उपस्थितत म्हासुर्णे येथील अंगणवाडीत संपन्न झाला
या कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन म्हासुर्णे गावचे सरपंच सचिन माने ,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,निमसोड बिट प्रमुख कुंभार मँडम ,पुसेसावळी बिट प्रमुख,गायकवाड मँडम,मोरे मँडम यांच्या हस्ते करण्यात आले व कार्यक्रमाचे अध्यक्ष सचिन माने ,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,गायकवाड मँडम यांचा सत्कार बेटी बचाव असा संदेश असणारा कप देवुन करण्यात आला.
पोषण पंधरावडा कार्यक्रमात बोलताना पुसेसावळी बिट प्रमुख गायकवाड मँडम म्हणाल्या आपल्या शरीराला पौष्टिक घटक लागतात त्या पदार्थाचे सेवन दररोजच्या जेवानात यावे यासाठी सर्वानी प्रयत्न करावे व पौष्टिक घटक लहान मुलांना सेवनात यावेत ही माहिती पालकांना द्या म्हणजे लहान मुलांची बौध्दिक पातळीत वाढ होण्यास मदत होईल.यामध्ये सोयाबिन ,शेवग्याचा पाला,शेगदाने,गुळ,विविध प्रकारचे फळे,सेवनात यावीत यासाठी सर्व अंगणवाडी सेविकांनी लोकांच्या मध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे .
यावेळी सचिन माने ,तुषार माने,गायकवाड मँडम यांची मार्गदर्शन लाभले,व सर्व अंगणवाडी सेविकांनी बनवुन आणलेल्या पौष्टिक खाद्य पदार्थाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमाला निमसोड बिट मधील निमसोड म्हासुर्णे पुनवडी,चोराडे शेनवडी,रहाटणी,कामथी,अंगणवाडी व सेविका मदतणीस उपस्थित होत्या व हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी म्हासुर्णे येथील अंगणवाडी सेविका व मदतणीस यांनी प्रयत्न केले.सुत्रसंचालन गायकवाड मँडम यांनी केले,व आभार अमृता सरकाळे यांनी मानले.