कराड : स्व. यशवंतराव चाव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन सालाबाप्रमाणे 24 ते28 नोव्हेंबर अखेर आयोजित केलेले आहे. प्रदर्शन स्थळावरील मंडपाचे भुमिपुजन उपविभागीय अधिकारी हिम्मत खराड व बाजार समितीचे संचालक संभाजी काकडे यांच्या हस्ते झाले. दरम्यान, कृषी प्रदर्शनाचा प्रचार रथ जिल्हयात रवाना झाला.
यावेळी तहसीलदार राजेंद्र शेळके, तालूका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, रतय कारखान्याचे अध्यक्ष अँड. उदयसिंह पाटील, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, कोयना दुध संघाचे उपाध्यक्ष बाबुराव धोकटे, रयत कारखान्याचे संचालक मोहनराव थोरात, रयत बायोशुगरचे संचालक तानाजीराव जाधव, बाजारा समितीचे सभापती अमृतराव पवार, उपसभापती आत्माराम जाधव, संचालक तानाजीराव जाधव, बाजार समितीचे सभापती अमृतराव पवार, उपसभापती आत्मराम जाधव, संचालक अशोकराव पाटील, मोहनराव माने, महादेव देसाई जगन्नाथ लावंड, जगदीश निकम, विजयकुमार कदम, सचिन गुणवंत , बाजार समितीचे सचिव बी. डी. निंबाळकर तसेच रॉयल स्मार्ट इम्पेक्स प्रा. लि. इम्पेक्स प्रा. लि.इव्हेंटसचे मॅनेजर सोमनाथ शेटे उपस्थित होते. प्रदर्शनाच्या मंडप व व्यवस्थेची माहिती देताना सोमनाथ शेटे म्हणाले, 1 लाख 50 हजार चौरस फुटावर प्रदर्शनाचा 7 पिअरलेस डोममध्ये मंडप उभारण्यात येणार आहे.
त्यामध्ये मंडप उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये 400 स्टॉल्स व स्वंतत्र पशु-पक्षी दालन, आरोग्य विभागाचे विशेष दालन, नवीन तंत्रज्ञान युक्त स्टॉलचा समावेश आहे. मंडप व परिसरात सर्व सोई-सुविधा असणार आहेत. शेतकरी बंाधवांसाठी 100 स्टॉल मोफत देण्यात येणार आहेत.
यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन मंडपाचे भुमिपुजन ; कृषी प्रदर्शनाचा रथ जिल्हयात रवाना
RELATED ARTICLES