सातारा : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा दिनांक 24 ते 28 जून 2017 या कालावधीत सातारा जिल्ह्यातून लोणंद, तरडगांव, फलटण व बरड मार्गे मार्गक्रमण करणार असून पालखी सोहळ्यात सहभागी लाखो भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पालखी सोहळ्यातील वाहनांखेरीज व अत्यावश्यक सेवेतील (पोली, रुग्णवाहीका, अग्निशामक वाहने खेरीज करुन इतर वाहनांना निरा-लोणंद- पंढरपूर मार्गावर दि. 24 ते 28 जून 2017 या कालावधीत प्रवेश बंदीचे आदेश मुंबई पोलीस कायदा कलम 34 नुसार पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी जारी केले आहेत.
दि. 23 जून रोजी सकाळी 6 ते दि. 27 जून रोजीच्या 10 वा. पर्यंत फलटण येथून निरा लोणंदकडे येणारी वाहतूक बारामती किंवा वाठार स्टेशन येथून पुणेकडे शिरगांव घाटातून वळविणेत येत आहे. दि. 24 जून रोजी 7 वा. पासून ते दि. 25 जून रोजी 17 वा. पर्यंत आदर्की फाटा येथून लोणंदकडे येणारी वाहतूक पालखी सोहळ्यातील येणारे वाहना खेरीज इतर वाहनांना बंद करणेत येत आहे. दि. 24 जून रोजीचे 9 वा.पासून ते दि. 27 जून रोजीची 13 वा. पर्यंत लोणंद येथून फलटणकडे जाणारी वाहतूक आदर्की मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे. दि. 26 जून रोजीचे 16 वा. पासून ते दि. 28 जून रोजीपर्यंत पंढरपूर येथून फलटणकडे येणारी वाहतूक शिंगणापूर तिकाटणे (नातेपुते) येथून शिंगणापूर मार्गे फलटणकडे वळविण्यात येत आहे. पालखी सोहळा दरम्यान पालखी मार्गावरील पालखी सोहळ्यातील वाहनाखेरीज इतर सर्व वाहने पर्यायी मार्गाने ये-जा करतील याची इतर वाहनाधारकांनी नोंद घ्यावी.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पालखी मार्गावरील वाहतुकीत बदल
RELATED ARTICLES