वडूज : वाकेश्वर (ता. खटाव) येथे आयोजित केलेल्या पशुचिकित्सा शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. राजमाची ता. कराड येथील दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय व वडूज येथील लघुसर्वपशुचिकित्सालयाच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
महाविद्यालयाच्या कृषी कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सहाय्यक आयुक्त डॉ. लियाकत शेख व नितीन खाडे यांनी शेकडो जनावरांची तपासणी केली. यावेळी गावातील जनावरांना महाविद्यालयाच्या वतीने फर्या व घटसर्प रोग प्रतिबंधात्मक लस टोचण्यात आली. मान्यवर ग्रामस्थांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी धनंजय क्षीरसागर, संदिप दळवी, शशिकांत फडतरे, बाळासाहेब फडतरे, नामदेव फडतरे, साबळे आदी उपस्थित होते.
ऋषीकेश शेलार, रोहित जाधव, वैभव जाधव, योगेश कचरे, शुभम खोमणे, आशिष पोकळे, शेषपाल खटके यांनी शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. हा उपक्रम यशस्वी केल्याबद्दल संस्थापक अभिजीत मोकाशी, प्राचार्य एस. एम. शिंदे, डॉ. विजय जगदाळे, एस. जी. कांबळे, श्री. बागल आदिंसह मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
वाकेश्वर येथील पशुचिकित्सा शिबिरास प्रतिसाद
RELATED ARTICLES

