सातारा : बुद्धीची देवता असलेल्या गणेशाचं स्वागत एका वेगळ्या पद्धतीनं करायचं सातार्यातील पद्माकर पाठकजी कुटुंबानं ठरवलं आणि त्यातूनच साकारला हा ज्ञानगणेश! घरातील पुस्तकांच्या अफाट संग्रहाचा वापर यासाठी करण्यात आला. 30 पैशांच्या जुन्या पुस्तकापासून ते तीन हजार रुपयापर्यंतच्या पुस्तकापर्यंत विविध विषयावरील अंदाजे 600 पुस्तके या सजावटीसाठी वापरली. कथा, कादंबर्या, कवितासंग्रह, अध्यात्मिक, पाककलाविषयक, चित्रपटविषयक, राजकारणावरील, अनुवादित अशी पुस्तकं यासाठी वापरली गेली. पुस्तकांची दीपमाळ तयार करण्यात आली आहे. तर पुस्तकांची छोटी पालखी करून त्यातही पुस्तके ठेवण्यात आली आहेत. पुस्तकांचा वापर करून रांगोळीही साकारण्यात आली आहे. याशिवाय पुस्तकांबद्दल नामवंत संत, तत्त्वज्ञ यांनी व्यक्त केलेले विचारही कॅलिग्राफी करून वापरण्यात आले. ज्ञानपीठविजेत्या मराठी साहित्यकृतींच्या नावातूनही गणेश साकारण्यात आला.
मराठीतील ज्ञानपीठफविजेत्या साहित्यकृतींच्या नावातून गणेशाचे चित्र साकारण्यात आले. उलगडलेल्या पुस्तकाचा कटआउट खास तयार करून घेतला. गेले अनेक दिवस सुरू असलेल्या श्रमानंतर हा ङ्गज्ञानगणेशफ प्रत्यक्षात आला. जुन्या पोथीपासून ते विश्वकोशाच्या ई-बुकपर्यंत विविध पुस्तके घरातील फर्निचरचा आधार घेऊन दर्शनी रूपात मांडण्यात आली. पुस्तकांबद्दल व्यक्त केलेल्या मान्यवरांचे विचार कॅलीग्राफीतून मांडण्यात आले आणि गमभन प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या दिनदर्शिकेच्या आधारे मराठीतील साहित्यिकांची छायाचित्रेही लावण्यात आली आणि संपूर्ण बैठकीची खोलीच पुस्तकांनी भरून गेली.
पद्माकर पाठकजी कुटुंबानं साकारला ज्ञानगणेश
RELATED ARTICLES