Saturday, May 17, 2025
Homeठळक घडामोडीशैक्षणिक मदत करणे हा गोडबोले कुटुंबीयांचा वेगळा पॅटर्न ; मान्यवरांकडून कौतुक

शैक्षणिक मदत करणे हा गोडबोले कुटुंबीयांचा वेगळा पॅटर्न ; मान्यवरांकडून कौतुक

सातारा दि.१४ – शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना जे गरीब व गरजू आहेत अशांना जात-पात न बघता सर्व थरातील सर्व जाती-धर्माच्या मुलांना मदत करणे हा एक महत्त्वाचा व वेगळा पॅटर्न सातारच्या गोडबोले कुटुंबीयांनी राबवलेला आहे आणि यातील महत्त्वाचे म्हणजे सातत्य असे प्रतिपादन आर्किटेक्ट गौतम भुरके यांनी रा.ना गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या शैक्षणिक मदत वाटपाच्या कार्यक्रमात बोलताना केले.

रा.ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्टच्या शैक्षणिक मदत वाटपाच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते नववी पर्यंतच्या 172 विद्यार्थ्यांना मिळून एकूण एक लाख 58 हजार रुपयांची मदत याप्रसंगी पाहुण्यांच्या हस्ते देण्यात आली.
यावेळी डॉ कौशिक पाटील , डॉ अजय पवार ,आर्किटेक्ट गौतम भुर्के , माजी नगरसेवक शकील बागवान हे मान्यवर उपस्थित होते. यावेळी या सर्वच पाहुण्यांनी गोडबोले ट्रस्टच्या या उपक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.
आपल्या उत्पन्नातील नफ्याचा काही भाग अशा प्रकारच्या सामाजिक कामासाठी बाजूला काढणे व त्यातून गोरगरीब मुलांना शैक्षणिक मदत करणे हे काम महत्त्वाचे आहे असे यावेळी बोलताना डॉ कौशिक पाटील यांनी सांगितले.
स्वागत व पाहुण्यांचा परिचय प्रद्युम्न गोडबोले यांनी करुन दिला. प्रास्ताविक व ट्रस्ट ची माहिती डॉ चैतन्य गोडबोले यांनी दिली.
आभार प्रद्युम्न गोडबोले यांनी मानले.
कार्यक्रमास माधवराव गोडबोले ,अशोक गोडबोले , डॉ अच्युत गोडबोले , आयडीबीआय ट्रस्ट च्या मानसी माचवे व त्यांच्या सहकारी , गौतम भोसले , आदी उपस्थित होते.
गोडबोले ट्रस्टच्या शैक्षणिक मदतीचे वाटप करण्याचा हा दुसरा टप्पा आहे पहिल्या टप्प्यात बालवाडी ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मदत देण्यात आली आणि आता पुढच्या तिसऱ्या टप्प्यात दहावी ते महाविद्यालय आणि संस्थांना मदत करण्यात येणार आहे अशी माहिती डॉ प्रद्युम्न गोडबोले यांनी दिली.
सर्व विभागात मिळून एकूण 50 विद्यार्थी व 21 संस्थांना मिळून पाच लाख 40 हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे.
समर्थ सदन ला झालेल्या या कार्यक्रमास विद्यार्थी त्यांचे पालक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular