फलटण : उसाला 3 हजार रुपये दर मिळावा यासाठी खा. राजू शेट्टी व ना. सदाभाऊ खोत यांनी 2013 मध्ये शेतकरी संघटनेत असताना चोधरावाडी येथे काही ट्रक्टरची तोडफोड केली होती. तर काही ट्रक्टरमधील हवा सोडणे व पंक्चर करणे असे प्रकार केले होते.
याप्रकरणी सुनावणी अंतीम टप्प्यात आली असून या दोघांनाही 3 नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.
2013 साली शेतकरी संघटनेचे नेते खा.शेट्टी व ना.खोत यांनी ऊस दराबाबत चिथावणीखोर वक्तव्य करुन दर मिळेपर्यंत ऊस तोड होऊ देणार नाही. त्यावेळी त्यांनी तालुक्यातील चौधरवाडी, जिंती रोड हद्दीतील ऊसाच्या गाड्या अडवुन हवा सोडणे, पंक्चर काढणे असे प्रकार केले होते.
यामुळे स्थानिक पदाधिकार्यांसह खा.राजु शेट्टी, ना. सदाभाऊ खोत, पंजाबराव पाटील, शंकर शिंदे, नितीन यादव, सचिन खानविलकर, रविंद्र घाडगे, अमोल तावडकर यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते.