सातारा : आई-वडील शेतात कामाला गेलेले असताना घरात एकटीच असलेल्या 6 वर्षाच्या मुलीवर गावातीलच एका 45 वर्षाच्या नराधमाने बलात्कार केल्याचे संतापजनक घटना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे-संमत वाघोली या गावात घडली आहे. पिडीत मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
काल सायंकाळी पिडीत आई-वडिल शेतात कामासाठी गेले होते. 6 वर्षाची मुलगी घरात एकटीच होती. संध्या 5 वाजण्याच्या सुमारास आरोपी संतोष भोईटे हा घरात घुसून त्याने त्या मुलीला फरफटत घराच्या मागील बाजूस असलेल्या शेडमध्ये नेवून तिच्यावर बलात्कार केला. आई-वडिल कामावरुन घरी पतरल्यानंतर त्यांनी मुलीची स्थिती बघून तिची विचारपूस केली असता तेव्हा पिडीत मुलीने झालेली घटना सांगितली. पिडीत मुलीच्या आई वडिलांनी गावकर्यांच्या मदतीने मुलीच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात नेवून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ हालचाली करुन नराधम संतोष भोईटे याला तात्काळ अटक केली. पिडीत मुलीवर जिल्हा शासकीय रुग्णालयात पुढील उपचार सुरु असून तिच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
ही घटना सातारा जिल्ह्यात पसरल्यानंतर विविध संघटनांनी या घटनेचा निषेध करत सताप व्यक्त केला. जिल्हा शासकीय रुग्णालयात राष्ट्रवादीचे आ. शशिकांत शिंदे, आरपीआयचे किशोर तपासे, अशोक गायकवाड, भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई तसेच शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी भेट देवून पिडीत मुलीच्या आई वडिलांचे भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी चंद्रकांत जाधव यांनी पिडीत मुलीच्या आईवडिलांना तात्काळ पाच हजाराची मदत दिली. नराधम संतोष भोईटे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि. 5 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.