मुंबई : राष्ट्रवादीचे पदाधिकारी मदन दराडे यांच्यावर निलंबित पोलीस निरीक्षक बी. आर. घाडगे याने त्याच्याकडील सर्व्हिस रिवॉल्व्हरमधून गोळीबार करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात दराडे थोडक्यात बचावले असून हा गोळीबार पूर्ववैमनस्यातून झाल्याचे उघड झाले आहे. तर गुन्हे शाखेने हल्लेखोर घाडगे याला ताब्यात घेतले असून त्याच्याकडून रिवॉल्व्हर हस्तगत करण्यात आले आहे. कल्याणच्या आधारवाडी रोडवर ही थरारक घटना घडली.
कल्याण-पडघा रोडला गांधारे गावातील ऋतुरिव्हर साईड सोसायटीत राहणारे मदन दराडे हे गुरूवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास आधारवाडी रोडने त्यांच्या एम एच 05/ ए एक्स/7531 इंडिका कारने घराच्या दिशेने जात होते. अनुभव हॉटेल समोर येताच अचानक निलंबित पोलीस निरीक्षक घाडगे याने ओव्हरटेक करून दराडे यांच्या कारला त्याची कार आडवी घातली. दराडे यांना शिवीगाळ करत माझ्या विरोधात गुन्हा दाखल करतोसफ असे बोलत त्याने स्वतः कडील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली आणि तेथुन पळ काढला. सुदैवाने ही गोळी कारमध्ये बसलेल्या दराडे यांच्या समोरील काचेस लागून डॅशबोर्डमध्ये घुसल्याने त्यांचा जीव वाचला. बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेत कार्यरत असताना पोलीस निरीक्षक घाडगे याच्या विरोधात दराडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. दराडे यांनी घाडगेला लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकविले होते. त्यानंतर घाडगे याचे निलंबन करण्यात आले होते. तेव्हापासून घाडगे हा दराडे यांच्यावर डुख धरून होता. त्याचाच राग मनात धरून घाडगे याने आपला काटा काढण्यासाठी गोळीबार केल्याचा आरोप मदन दराडे यांनी केला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथून रिकामी पुंगळी हस्तगत केली. घटनास्थळी कल्याण परिमंडळाचे पोलिस उपायुक्त संजय शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी पाहणी केली. याप्रकरणी दराडे यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्यात शुक्रवारी मध्यरात्री फिर्याद दाखल करण्यात आली असून घाडगेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी रिवॉल्व्हरसह घाडगेला ताब्यात घेऊन हा तपास गुन्हे अन्वेषण विभागाच्या कल्याण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. गोळीबार करण्यासाठी घाडगे याने कोणते रिवॉल्व्हर वापरले, एकूण किती गोळ्या झाडल्या, याचा वपोनि शैलेंद्र नगरकर अधिक तपास करत आहेत.
——————–