भिलार : राज्यात नगपालिका निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर झाला असुन या निवडणूकीत मतदानासाठी पात्र असणारी व्यक्ती मतदानापासून वंचीत राहू नये यासाठी विशेष मतदार नोंदणी मोहिम राबवण्यात येणार आहे. सर्व राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधींनी व नागरीकांनी यासाठी पुढाकार घेऊन मतदार नोंदणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन पाचगणी नगरपालिकेच्या मुख्याधिकारी अमिता दगडे- पाटील यांनी केले.
पाचगणी पालिकेच्या छत्रपती शिवाजी सभागृहात निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार तातडीने बोलावण्यात आलेल्या बैठक़ीमध्ये मुख्याधिकारी सौ.दगडे -पाटील बोलत होत्या. यावेळी उपनगराध्यक्ष लक्ष्मण पार्टे, नगरसेवक दिलीप बगाडे, शेखर कासुर्डे, प्रविण बोधे, नगरसेविका सौ. सरोज कांबळे, रेखा कांबळे तसेच माजी नगरसेवक दत्तात्रय दुधाणे, शरद कासुर्डे, सुनिल उंबरकर, अशिष दवे, नामदेव चोपडे, सुधाकर बगाडे तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतीनीधी, पालीकेचे अधीकारी , कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.
मुख्याधीकारी दगडे -पाटील म्हणाल्या आगामी निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर मतदार जागृती अभियान राबवण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महाविद्यालयातील प्रायार्यानीं सुध्दा मतदार नोदंणी बाबत विशेष लक्ष द्यावे. मतदार नोंदणीसाठी लागणारी सर्व कागदपत्रे व पुरावे अधिकार्यांना देणे आवश्यक आहे. तर इतरहून पाचगणीत शिकण्यासाठी आलेले विद्यार्थी आणि नोकरीनिमीत्त आलेल्यांची यादीत नोंदणी करताना पुर्वीचे नाव कमी केल्याचा पुरवा असल्याशिवाय नव्या यादीत समावेश करता येणार नाही. दोन्हीकडे नाव येणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
31 ऑगस्ट पर्यंत 18 वर्ष पुर्ण असणार्यांना मतदान यादीत नाव नोंदणी करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे 10 सप्टेबर 2016 रोजी अंतीम मतदार यादी प्रसीध्द केली जाणार आहे. मतदार यादी नोंदणी निरंतर चालणारी प्रक्रिया असली तरी आगामी निवडणूकीत 18 वर्ष पुर्ण झालेला मतदार मतदानापासुन वंचीत राहू नये याची काळजी घेण्यात येणार आहे.
पाचगणी हे शैक्षणिक केंद्र असल्याने या ठिकाणी शिकण्यासाठी बाहेरून राज्य तसेच परदेशातुन येणार्या विद्यार्थ्यांच्या समावेशा विषयी नागरिकांमधुन जोरदार आक्षेप घेण्यात आला. काही शाळांमध्ये पुर्वी जबरदस्तीने नावे मुख्याध्यापकांच्या पत्रावरून नोंदण्यात आल्याचे माजी नगराध्यक्ष शेखर कासुर्डे यांनी निदर्शनास आणून दिले. शाळेतील आणि बाहेरून येथे शिकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या एकगठ्ठा मतदारांच्या हाती जर उमेदवाराचे भवितव्य ठरणार असेल तर स्थानकींनी निवडणूक लढवायची की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे. यावर मुख्याधिकार्यांनी जर अशा नोंदीवर आक्षेप घेतला तरच ही नावे ठेवायची की नाही या विषयी मार्ग निघणार असल्याचे सांगितले. त्यासाठी प्रथम आक्षेपाची प्रक्रिया होणे गरजेचे आहे
मतदान नोंदणीसाठी सहकार्य करावे : मुख्याधिकारी पाटील
RELATED ARTICLES