साताराः तब्बल सातारकरांच्या तीनपिढयाहून लोकप्रिय ठरलेले स्व. शामण्णा शानभाग यांच्या संकल्पनेतून साकारलेले हॉटेल रजताद्री आता पुन्हा एकदा नव्या रूपात सातारकरांच्या सेवेसाठी सादर झाले आहे. काही वर्षापुर्वी केवळ दाक्षिणात्य पदार्थासाठी लोकप्रिय असणारे हॉटेल रजताद्री आता काळाच्या अनुरूप बदल घडवत व्हेज आणि नॉनव्हेज प्रकारच्या खवैय्यासाठी आता भव्य अशा सुसज्ज अंतर्गत सजावट असणार्या आकर्षक दालनाद्वारे सातारकरांसाठी खुले झाले आहे.
मागील वीस वर्षाच्या काळात या हॉटेलच्याद्वारे करण्यात आलेली खाद्यसेवा आजही तितकीच लोकप्रिय असून नव्या उमेदीचे आणि नव्या पिढीचे या हॉटेलचे संचालक संकेत शानभाग यांनी आपले वडील रमेश शानभाग यांच्या मार्गदर्शनातून हे अत्याधुनिक दालन साकारले आहे. केवळ जिल्हयातच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात सातारकरांच्या सेवेत सुरू झालेले हे नवे दालन नुकतेच उदघाटन सोहळयाने सादर झाले. या हॉटेलचे प्रमुख संचालक, ज्येष्ठ क्रिडा संघटक व मार्गदर्शक रमेश शानभाग यांनी सौ. उषा शानभाग यांचे हस्ते दीप प्रज्वलित करून हे नुतन दालन खवैय्यासाठी सुरू झाले. याप्रसंगी सुप्रसिध्द आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल पटू अमित आंबेडकर व सौ. काजल आंबेडकर, संकेत शानभाग, सुधाकर शानभाग, सौ. उषा शानभाग, माजी उपनगराध्यक्ष अॅड. दत्ताजी बनकर, अॅड. कमलेश पिसाळ, नारायणराव, सौ. कविता शानभाग, राहूल घायताडे, महेश निकम, नितीन भोसले, नागेंद्र भंडारी, प्रशांत शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
नव्याने सेवेत रूजू झालेल्या या हॉटेलचे दालनाची अत्याधुनिक अंतर्गत सजावट सातारा येथील सुप्रसिध्द आर्किटेक्ट श्री महाजनी यांची असून या दालनात साऊथ इंडियन, महाराष्ट्रीयन, पंजाबी,कॉन्टिनेंटल तसेच फास्टफुड, ज्युसेस, आईस्क्रीम, सॉफट ड्रींकचे शेकडो प्रकार असून खवैय्यासाठी व्हेज व नॉनव्हेज प्रकारात ही सेवा दिली जाणार आहे. हॉटेलमधील व्हेज व नॉनव्हेजच्या खाद्यपदार्थासाठी सेपरेट किचन बनविण्यात आले असून हे आधुनिक हॉटेलचे दालन सातारकरांच्या निश्चितच पसंतीस उतरेल अशा शब्दांत संकेत शानभाग यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या नुतनीकरण सोहळयासाठी विविध मान्यवरांनी उपस्थित राहून शानभाग परिवारास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
लोकप्रिय आणि सातारचा मानबिंदू ठरलेले रजताद्री हॉटेल नुतनीकरणानंतर सातारकरांच्या सेवेत ; एकाचवेळी शंभरहून अधिक खवैय्यांसाठी एकमेव भव्य दालन ; व्हेज- नॉनव्हेज प्रकारच्या डिशेस
RELATED ARTICLES