माचुतर गावाजवळ दरड कोसळुन रस्ता पुर्ण बंद
महाबळेश्वर : गेली दोन आठवडे येथे मोठया प्रमाणावर पाउस कोसळत असल्याने अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना ताजी असतानाच आज येथुन आठ कि मी अंतरावर डोंगराच्या कुशीत व तीव्र उतारावर वसलेल्या माचुतर गावाजवळ चार वाजणेच्या सुमारास भली मोठी दरड कोसळुन गावाला जाणारा रस्ताच पुर्ण बंद झाला आहे सुदैवाने या अपघातात वित्त अथवा जीवीत हानी झाली नाही घटनास्थळाला पंचायत समितीचे उपसभापती संजय गायकवाड व त्यांचे सहकारी यांनी भेट देवुन पाहणी केली व संबंधित विभागाने ही दरड तातडीने काढुन टाकावी व रस्ता पुर्ववत सुरू करावा अशी मागणी केली आहे या वेळी उदयोगपती डी एल शिंदे हे ही उपस्थित होेेते.
महाबळेश्वर केळघर मार्गावर माचुतर गाव आहे. हे गाव दोन विभागात वसले आहे काही घरे रस्त्यालगत वरच्या भागात तर मुळ गाव तेथुन डोंगर उतारावर खालच्या बाजुला वसले आहे. याच ठिकाणी गावाचे ग्रामदैवत असुन यात्रेसाठी सर्व गाव याच ठिकाणी एकत्र येते डोंगर उतरावर वसलेले गाव दरडी पासुन सुरक्षित असले तरी या गवातील काही घरे दरडीच्या कक्षेत येतात जर मोठया प्रमाणावर दरड कोसळली तर या गावातील काही घरे माळीण गावा प्रमाणे या दरडीखाली गाडली जाण्याचा धोका आहे. आज मात्र दरड घरापासुन थोडयाच अंतरापर्यत कोसळली त्यामुळे घरे सुरक्षित राहिली आहे. चार वाजणेच्या सुमारास कोसळलेल्या दरडी मधील मोठ मोठया आकाराचे दगड रस्त्यावर आले व हा रस्ताच बंद झाला असुन या रस्त्याने होणारी सर्व वाहतुक बंद झाली आहे.
या गावाला केळघर मार्गे येताना एक डांबरी रस्ता आहे परंतु महाबळेश्वर कडुन येताना सोईस्कर असलेला रस्ता बंद झाल्याने मोठा वेढा घालुन गावात वाहन घेवुन जावे लागते अथवा भला मोठा डोंगर चढुन महाबळेश्वर मेढा रस्त्याला यावे लागत आहे. दरम्यान दरड कोसळल्याची खबर मिळताच पंचायत समितीचे उपसभापती यांनी तातडीने घटना स्थळाकडे धाव घेतली दरडीची पाहणी करीत असताना गावातील सर्व प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते. यामध्ये गावातील प्रसिध्द उदयोगपती डी. एल. शिंदे गावचे सरपंच नारायण शिंदे माजी सरपंच सतिश शिंदे डॉ. प्रमोद शेलार भगवान शिंदे, नाना शिंदे, सुरेश शिंदे पाटील, अरूण शिंदे, मारूतीबापु शिंदे पंचायत समितीचे ग्रामविस्तार अधिकारी सुनिल पार्टे व तलाठी घुगे यांचा समावेश होता. हा रस्ता मुख्य रहदारीचा आहे गावातुन रोजगारासाठी अनेक मंडळी महाबळेश्वरला जात असतात बरीच मुले ही याच रस्त्याने शाळेला जात असतात तरी संबंधित शासकिय विभागाने रस्त्यावर आलेली दरड तातडीने हटविण्याचे काम करावे अशी मागणी पं.स. उपसभापती संजयबाबा गायकवाड यांनी केली आहे.