पुसेगांव : खटाव तालुक्यातील येरळा नदीच्या तीरावर वसलेले नागनाथवाडी या गावातील जागृत प्राचीन शिवमंदिराची श्रावण सोमवारच्या निमित्ताने आज नागराजाच्या रूपातील नागनाथाच्या दर्शनासाठी हजारो भाविकांनी गर्दी केल्याने नागनाथवाडी भक्तांच्या गर्दीने फुलुन गेले. खटाव तालुक्या बरोबर सातारा जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून विशेष: महिला भाविकांनी मोठया प्रमाणात हजेरी लावली. आज पहाटे शिवलिंगावरती नागनाथाचे पुजारी रामदास गुरव आणि सहकारी यांनी अभिषेक केला त्यानंतर भाविकांनी दर्शन घेतले. नागनाथाच्या दर्शनासाठी भली मोठी रांग लागली.
लहान नागराजांच्या दर्शनासाठी आणि आपला नवस बोलण्यासाठी महिला भाविक मोठया श्रध्देने नागनाथ वाडीस येतात. यावेळी पाच नागराजांनी दर्शन दिले असून त्यांच्या दर्शनासाठी सिंहासन मंदिरात महिलांनी गर्दी केली होती. आपल्या मनातील नवस बोलुन या नागराजांच्या समोन आपला पदर पसरायचा आणि नागराजांची इच्छा असेल तर नागराज पदरांच्या दिशेन येतात अशी श्रध्दा अशी श्रध्दा असल्यायने मोठया भक्ती भावाने संततीसाठी नवस बोलण्यासाठी खुप लांबुन भाविक येतात.
या यात्रेत मंदिर परीसरात अनेक जिलेबी आणि पेढयांची मोठ मोठी दुकाने आली आहे या दुकानाबरोबर खेळणी, महिलांचे वेगवेगळे साहित्याची दुकाने सजली आहेत. या दुकानाबरोबर अनेक खेळण्याची पाळणा, घोडागाडी या लहानगोपाळांना मनोरंजनाचे साहित्य आल्याने या यात्रेचे स्वरूप मोठे होत आहे.
सात नागराजांनी दर्शन दिले
दरवर्षी श्रावण महिन्यात हे नागराज दर्शन देत असतात. यावेळी सात नागराजांनी दर्शन दिले आहे. या नागराजांच्या दर्शनासाठी सिहासन मंदीरात मोठया प्रमाणत गर्दी झाली होती. गर्दी जास्त असल्याने अनेकांना नागनाथांचे दर्शन झाले नाही त्यामुळे लांबुन आलेल्या भाविकांनी नाराजी व्यक्त केली.
नागनाथ मंदिर परिसराचा विकास व्हावा
35 फुट खोल पायर्या उतरून शिवलिंगाचे दर्शन, श्रावण महिण्यात जिवंत नागराजांचे दर्शन या ना अनेक आश्चर्याने आणि वैशिष्टयांनी परिपूर्ण असलेले नागनाथ मंदीर आणि परिसराचा विकास म्हणावा तसा झाला नाही. भक्तांसाठी भक्त निवास,वाहन पार्कींग या सुविधा निर्माण व्हाव्या अशी भावना भाविक व्यक्त करत होते.