महाबळेश्वर ः महाबळेश्वर नगरपरिषदेच्या वेण्णालेक सुशोभीकरण किंमत 67 कोटी प्रस्तावा बाबत मा.ना. जयकुमार रावल (पर्यटन मंत्री, महाराष्ट्र राज्य ) यांनी मा.ना. रणजीत पाटील (नगर विकास , राज्य मंत्री महाराष्ट्र राज्य ) यांच्या मागणीवरून व माधवजी भंडारी (मुख्य प्रवक्ते भा. ज.प.) यांच्या पुढाकाराने मुंबई येथे मंत्रालय मध्ये बैठक आयोजित करण्यात आली . या बैठकीत महाबळेश्वर पालिकेच्या नगराध्यक्षा स्वप्नालीताई शिंदे मुख्याधिकरी व नगरसेवक उपस्थित होते.
या बैठकीत महाबळेश्वर मधील पर्यटकांचे मुख्य आकर्षण स्थळ वेण्णालेकयामध्ये पर्यटकाचे आवडते स्थळ म्हणून ओळखले जाते याचं वेण्णालेक मध्ये नौकाविहार करण्यासाठी पर्यटकाची भली मोठी रांग लागलेली असते यामध्ये पालिकेचे सर्वात जास्त उत्पन्न देणारे ही वेण्णालेक बोट क्लब प्रसिद्ध आहे यामध्ये बोटक्लब वरती विविध सुविधा 1) लाईट लेजर शो 2) म्युझिकल फाऊंटन 3) दोन फ्लोटींग रेस्टॉरंट्स 4) अद्ययावत जेटी व बैठक 5) बैठक व्यवस्था व घाट 6) वुडन वॉकिंग वे 7) अद्ययावत कार पार्क 8) शिवाजी महाराज स्मारक या सर्व कामांचा समावेश आहे , या प्रस्तावाचे प्रेझेंटेशन नगरसेवक कुमार शिंदे यांनी केले .
या बैठकीत पर्यटन मंत्री यांनी सांगितले की, महाबळेश्वर हे खुप प्रसिध्द पर्यटन स्थळांपैकी एक स्थळ आहे. महाबळेश्वर कडे पर्यटक सुमारे 15ते 18 लाख भेट देतात यामध्ये पर्यटकाचे आवडते स्थळ म्हणून ओळखले जाते याचं वेण्णालेक मध्ये नौकाविहार करण्यासाठी पर्यटकाची भली मोठी रांग लागलेली असते यामध्ये पालिकेचे सर्वात जास्त उत्पन्न देणारे ही वेण्णालेक बोट क्लब प्रसिद्ध आहे त्यामुळे नविन पर्यटन स्थळे निर्माण करण्यापेक्षा जी आहेत तीच पर्यटन स्थळे अधिक सुसज्ज व अद्ययावत करण्यावर आमचा भर असल्याचे त्यांनी सांगितले . वेण्णा लेक साठी दोन टप्यात देणार . येत्या 90 दिवसांत वेण्णा लेक सुशोभिकरणाचा आणखी आर्कषित व अद्ययावत सचविधांसह विकास आराखडा (ऊझठ ) तयार करुन पुन्हा सादर करण्याच्या सुचना पालिकेस दिलेल्या व या प्रस्तावास निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही दिली . या बैठकीस मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील व आर्किटेक्ट विकास लब्बा व महाबळेश्वर पालिकेचे उपनगराध्यक्ष अफजल सुतार ,नगरसेवक कुमार शिंदे ,रविंद्र कुंभारदरे , युसूफ शेख ,व व्यवसायिक संदिप आखाडे उपस्थित होते.
महाबळेश्वरच्या वेण्णालेक सुशोभीकरणाचा 67 कोटींचा प्रस्ताव
RELATED ARTICLES