फलटण : फलटण शहरामध्ये आज ऐतिहासिक लोकसंख्या असलेल्या संविधान समर्थन मोर्चाची नोंद झाली. सर्व बहुजन समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये अडीच लाख लोक मोर्चामध्येे सहभागी झाले होते. या मोर्चामधे सर्व बहुजन समाज एकत्र आल्याचे चित्र पहिल्यांदाच फलटणकरवासियांना पहावयास मिळाले. या मोर्चामध्ये अॅट्रासिटी कायदा कडक केला पाहिजे, इतर बहुजन समाजावर अत्याचार होत असून या प्रवर्गाला अट्रासिटीमध्ये घेण्यात यावे, खैरलांजी ते कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, दाभोळकर, पानसरे, कुलबर्गी या विचारवंताच्या आरोपीस तात्काळ अटक करुन फाशीची शिक्षा देण्यात यावी व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी, डउ, डढ, छढ, जइउ यांचे आरक्षण अबाधित ठेऊन मराठा, मुस्लीम व धनगर समाजाला आरक्षण देण्यात यावे, फलटण तालुक्यातील सुमित अहिवळे, रोहन काकडे, अनुराग अहिवळे यांची हत्या करण्यांनाही कडक शासन व्हावे अशा प्रमुख मागण्या या संविधान समर्थन मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आल्या.
फलटणकर वासियांना संविधान मोर्चाचा माध्यमातून हा ऐतिहासिक क्षण पाहिला. मोर्चाची सुरुवात येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन, मंगळवार पेठ येथून झाली, येथून धम्मयान चौक, पंचशील चौक, बारामती चौक, छत्रपती शिवाजी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, महावीर स्तंभ, उमाजी नाईक चौक, गजानन चौक, महात्मा फुले चौक मार्गे येथील तहसिल कार्यालयावर धडकला. या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे या मोर्चामध्ये महिला या मोठ्या संख्येने सहभागी होत्या. फलटण शहरामध्ये आजपर्यंत झालेल्या मोर्चामधील हा सर्वात मोठा मोर्चा झाल्यामुळे याची ऐतिहासिक नोंद झाली. या मोर्चाची सुरुवात संविधान प्रस्तावना वाचून करण्यात आली. या मोर्चामध्ये शिस्त पाहावयास मिळाली. संविधान समर्थन मोर्चाचे वैशिष्टय म्हणजे खर्डाई येथे नितीन आगे या युवकाची हत्या झाली होती त्याचे वडील राजु आगे यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची माहिती मोर्चाच्या माध्यमातून दिली. तसेच शिर्डी येथील सागर शेजवळ यांची बाबासाहेबांची रिंगटोन वाजवली म्हणून हत्या करण्यात आली होती. यावेळी नितीन शेजवळ ही उपस्थित होते.
संविधान समर्थन मोर्चास फलटण तालुका खाटीक संघटना, मुस्लीम संघटना, धनगर समाज संघटना, माळी समाज संघटना, मेहतर समाज संघटना, होलार समाज संघटना, नाभिक संघना, कोष्टी संघटना, शिक्षक संघटना,मातंग संघटना अशा अनेक संघटनांनी लेखी स्वरुपात आपला पाठींबा देण्यात आला. संविधान समर्थन मोर्चासाठी मोर्चासाठी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच या मोर्चासाठी 500 स्वयंसेवक ठेवण्यात आले होते त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
संविधान समर्थन मोर्चाच्या मागण्या या बहुजन समाजाच्या वतीने महिला प्रतिनिधीने वाचून दाखवल्या,तसेच पिडीत व्यक्तींनी आपल्यावरील झालेला अन्याय जनसमुदायापुढे मांडल्या. यानंतर पिडीतांच्यावतीने उपविभागीय अधिकारी संतोष जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे, तहसिलदार विजय यांना मागण्यांचे निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.