सातारा : सातारा पालिकेचा 2018-19 वर्षाचा अर्थसंकल्प मंगळवार दि. 27 रोजी नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या सभेत उपाध्यक्ष राजेशिर्के सदस्यांसमोर मांडतील. सुमारे सव्वा दोनशे कोटीच्या अर्थसंकल्पात पालिकेच्या उत्पन्न वाढीसह विविध विकासकामांसाठी करण्यात आलेल्या तरतुदीसह उत्पन्नवाढ व अखार्चिक निधीवर खल होणार आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक दिसणार असले तरी येणार्या वर्षात पालिका काय देणार? हेही सातारकरांना पहायला मिळणार असल्याने या वादळी सभेकडे सातारकरांच्या नजरा लागल्या आहेत.
2017-18 चा अर्थसंकल्प एकनाअनेक त्रुटींमुळे जून महिन्यापर्यंत जिल्हाधिकार्यांच्या मंजुरीसाठी रखडला होता. त्यामुळे यंदा 2018-19 चा सव्वादोनशे कोटींचा अर्थसंकल्प सादर करताना सत्ताधारी ताकही फुंकून पिणारफ हे निश्चित आहे. मात्र, मागील वर्षी तरतूद केलेला निधी खर्ची न टाकता यंदाच्या अर्थसंकल्पाच्या शिलकीत नाही. यासह उत्पन्न वाढीसाठी मिळकतींचे फेरमुल्यांकन करून भाडे निश्चिती करण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी दिले होते. त्याची पूर्तता झालेली नाही. पालिकेचा हाल, खासदार फंडातील इमारतीत शिरलेले भाडेकरू, वाहनांचे भाडे, शाळांच्या दुरुस्तीचे घोंगडे यासह रस्ते, वीज-पाणी आणि उद्यान मैदाने यावर होणारा खर्च अर्थसंकल्पातून मांडावा लागणार आहे. तसेच गणेश विसर्जनासाठी यंदा 35 लक्ष तरतूद करण्यात आली आहे. आनंदाची बाब म्हणजे पोहण्याच्या तलावाला यंदा 25 लक्ष तरतूद केल्यामुळे बालगोपाळांना महागड्या जलानंदापासून सुटका मिळणार असल्याने सत्ताधार्यांचे कौतुक होत आहे. तसेच दलित वस्ती निधी शिल्लक असल्याने जिल्हाधिकार्यांनी ताशेरे ओढले होते. त्यामुळे हा निधी खर्ची टाकण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. सोबतच विविध कामांसाठी पालिकेने घेतलेल्या कर्जाचे हप्ते गेलेले नाहीत आणि संबंधित कामे सुरुही झालेली नाहीत. ही कर्जे अर्थसंकल्पात न दाखवल्यामुळे खल होण्याची चिन्हे वाढली आहेत. विशेषतः एमजीपीचे सुमारे 50 कोटी पालिकेला देणे आहे, हे नमूद नसल्याने नव्या वादाला तोंड फुटणार असले तरी ही सभा वादळी ठरणार आहे.
करंजे एमआयडीसीतून उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न होत नाहीत. मातब्बर सदस्य फंड पळवतात, त्यामुळे सदस्यांना प्रभाग फंड 20 लाख प्रतिवर्ष करण्यात यावा. तसेच फंड वाटपात दुजाभाव करण्यात येवू नये, अशी मागणी शेखर मोरे-पाटील यांनी केली आहे.