ढेबेेवाडी: दैदीप्य विजय कांबळे विद्यालय जिंती ता.पाटण या शाळेमध्ये सेवायोग सामाजिक विकास प्रतिष्ठाण कराड बालसंस्कार शिबीर दि. 27 ते 29 असे तीन दिवसांचे शिबीर आयोजित केले होते.
या कार्यक्रर्माची रुप रेषा गाणी, पथनाट्य, आरोग्य, चित्रपट, पसायदान, श्लोक, योगासने, सूर्यनमस्कार, इतिहास ओळख, वेशभूषा, मर्दानी खेळ, झांजपथक, ग्रंथ दिंडी, ऐतिहासिक असे कार्यक्रम आयोजित केले होते.29 तारखेला शेवटच्या दिवशी ग्रंथ दिंडी काडून कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी बोलताना मानसिंग पाटील (सहाय्यक कक्ष अधिकारी सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय मुंबई) यांनी सांगितले की, देदीप्य विजय कांबळे विद्यालय जिंती हे दुर्गम व डोंगराळ भागात असून या शिबिराचा मुख्य हेतू हा आहे की, व्यक्तिमत्व विकास, पर्यावरण पूरक विविध उपक्रम राबिवणे त्या बद्धलची माहिती मुलांना देने हा हेतू या शिबाराचा आहे.यावेळी मुख्याध्यापक विजय भंडारे, शिक्षक, समाजसेवक सचिन पवार, ग्रामस्थ, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.