भिलार: बोन्डारवाडी (ता.महाबळेश्वर) येथील सामाजिक कार्यकर्ते व हॉटेल हिलटॉपचे मालक युवानेते अभय डोईफोडे यांना लघुउद्योग व पर्यटन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल महाबळेश्वर पंचायत समितीच्या वतीने पुरस्कार देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
महाबळेश्वर या पर्यटन व पाचगणी या जागतिक दर्जाच्या शैक्षणिक केंद्राच्या मध्यवर्ती ठिकाणी असणार्या बोण्डारवाडी या छोटेखानी गावात पर्यटनाच्या माध्यमातून विशेष काम करण्याबरोबरच सर्वसामान्यांना परवडेल अशा पद्धतीचे कृषी पर्यटन निवासाची सोय केली आहे. तर न्याहरी निवासाच्या माध्यमातूनही पर्यटकांना रुचकर अशा जेवणाची व्यवस्था त्यांनी साकारली आहे. तर उद्योगाची कास धरत असताना युवा कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन समाजीक विकासाच्या कामातही डोईफोडे अग्रेसर आहेत.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा पूरस्कार बाळासाहेब भिलारे यांच्या वाढदिवसाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात भिलार येथे आमदार मकरंद पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
याबद्दल अभय डोईफोडे यांचे आमदार मकरंद पाटील, जिल्ह्याचे ज्येष्ठनेते बाळासाहेब भिलारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबुराव संकपाळ, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, जिल्हा परिषद सदस्या नीता आखाडे, महाबळेश्वरच्या सभापती रुपाली राजपूरे,
उपसभापती अंजनाताई कदम, सदस्य संजुबाबा गायकवाड, महाबळेश्वर अर्बन बँकेचे संचालक दत्ता वाडकर, प्रवीन भिलारे, मनीष भंडारे, जावळी बँकेचे संचालक विनोद कळंबे, रोटारीचे अध्यक्ष महेंद्र पांगारे, नितीन बेलोशे, भिलारच्या सरपंच वंदना भिलारे, संतोष आखाडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरानि अभिनंदन केले आहे.