सातारा : गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत असललेल्या दिव्यनगरी नळ पाणीपुरवठा योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार भारतीय जनता पार्टी सातारा शहराचे अध्यक्ष सुनिल काळेकर, युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप मेळाट व ग्रामस्थांच्या सहकार्याने उघडकीस आणला होता. परंतु काही राजकीय वरदहस्तामुळे गुन्हे दाखल करण्याचे लेखी आदेश असतानादेखील आतापर्यंत गुन्हे दाखल झाले नव्हते. यावर शहराध्यक्ष सुनिल काळेकर यांनी थेट मंत्रालयातून ना. बबनराव लोणीकर, मंत्री पाणी पुरवठा व स्वच्छता महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयातून कारवाईचे लेखी आदेश आणल्यानंतर मात्र जिल्हा परिषद प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास शिंदे यांनी या प्रकरणातील भ्रष्टाचाराबाबत अहवाल सादर करण्याकरिता तीन सदस्यीय समिती नेमली. या समितीमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. बी. पाटील मुख्य काम बघत आहेत. पाटील यांच्या आदेशानुसार 30 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषदेमध्ये बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीमध्ये कोंडवे ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक सदस्य व अधिकारी उपस्थित होते. यावेळी दिव्यनगरीचे ग्रामस्थ व भाजपा पदाधिकार्यांनी योजनेमधील भ्रष्टाचाराचे अनेक पुरावे सादर केले. उदा. विहिरीचे बक्षीसपत्र फसवून करणे, ठेकेदाराला नळ कनेक्शन देण्याचा अधिकार नसताना नळ कनेक्शन देवून पाणी कराच्या नावाखाली खोट्या पावत्या देवून कोंडवे ग्रामपंचायतीच्या शिक्क्याचा गैरवापर करत लाखो रुपये गोळा करणे पाण्याच्या मेन लाईनला कनेक्शन देणे, योजनेमध्ये वापरण्यात आलेल्या सर्व वस्तू नित्कृष्ट दर्जाच्या असल्याने सातत्याने पाईप लिकेज होणे, या सर्व बाबी वेळोवेळी जिल्हा परिषद प्रशासन व कोडवे ग्रामपंचायतीच्या तिदर्शनास आणून देखॅल केवळ राजाश्रयामुळे पाणी पुरवठा योजनेमधील भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या शंकर माने या व्यक्तिला कोंडवे ग्रामपंचायतीने कामाला ठेवले असल्याने कोंडवे ग्रामपंचायतीच्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेे. व त्याच बरोबर धनधांडग्यांच्या सोईकरिता मेन लाईनवरुन दोन दोन इंची नळ कनेक्शन दिले आहे. पाणीपट्टीची झळ मात्र दिव्यनगरीतील ग्रामस्थांना 2 हजार रुपये भरुन सोसावी लागत आहे. वास्तविक पाहता शहरी भागामध्ये फिल्टरेशन प्लँन्टचे पाणी मिळूनदेखील दोन हजार रुपये पाणी कर आकारत नाहीत पण कोंडवे ग्रामपंचायतीच्या सोईच्या कामामुळे सर्वसामान्य नागरिकांना झळ पोहोचत आहे. पाणीपट्टी वेळेत भरुनदेखील केवळ आठवड्यातून एकदाच पाणी दिले जात असल्याने संतप्त नागरिकांनी लेखी तक्रार दिली आहे. योजनेतील भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या अधिकार्यांवर व पदाधिकार्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी दिव्यनगरीचे ग्रामस्थ व भाजपचे पदाधिकारी यांनी यावेळी केली. लवकरच या योजनेमधील भ्रष्टाचारांवर फौजदारी गुन्हे दाखल होतील असा विश्वास भाजपा शहराध्यक्ष सुनिल काळेकर यांनी व्यक्त केला.
दिव्यनगरी नळ पाणीपुरवठा योजनेमधील झालेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर
RELATED ARTICLES