सातारा : भारत हा कृषीप्रधान देश आहे. बि-बियाणांच्या बाबतीत वितरक व विक्रेत्यांनी तांत्रिकदृष्टया सतर्क असले पाहिजे. सर्व गोष्टीचे सर्व रेकॉर्ड आपण व्यवस्थित ठेवा. देशात रासायनिक खतांची संख्या कमी करून शेतीत सेेंद्रिय खताच्या माध्यमातून उत्पादने कशी पिकवता येतील याचा सतत विचार केला पाहिजे. अनेक प्रबोधनात्मक गोष्टीअशा चर्चासत्रातून दिल्या जातात. शेतकर्यांना प्रवाही पाणी देण्याची पध्दत बदलून ठिबक सिंचनाद्वारे पाणी देण्याची सुविधा करण्यासाठी शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन करावे तसेच ऊस पिकांपेक्षा इतर पिकांच्या साह्याने शेती करावी व आर्थिक उत्पन्न वाढवावे. आज जास्तीत जास्त रोजगार शेती व्यवसायात असताना बि-बियाणे व खते विक्रेत्यांना प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन जिल्हयाचे पालकमंत्री ना.विजय शिवतारे यांनी काढले.
सातारा येथील जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजीत रासायनिक खते, बि बियाणे व किटक नाशके विक्रेते संघटनेच्यावतीने खरीप हंगाम गुणनियंत्रण कार्यशाळेस या विषयावर आयोजीत कार्यशाळेत ना.शिवतारे यांनी प्रमुख पाहूणे म्हणून मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र राज्य रासायनिक खते डीबीटी कृषी आयुक्तालयाचे राज्य समन्वयक दलजितसिंग हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते.तसेच यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुनिल बोरकर, जि. प. कृषि विकास अधिकारी व्ही.ए.पवार,, कोल्हापूर येथील गुणनियंत्रण विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयाचे तंत्र अधिकारी पंडीतराव वाबळे, रासायनीक खते, बि बियाणे व किटकनाशके डिलर असोसिएशनचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष राजन मामणिया सातारा जिल्हा रासायनीक खते, बि बियाणे व किटकनाशके डिलर असोसिएशनचे उपाध्यक्ष रणजीत निंबाळकर, यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन करुन झाले. यावेळी सर्व मान्यवरांचा सत्कार संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देउन करण्यात आला.
आपल्या प्रास्ताविक भाषणात बोलताना सुनिल बोरकर म्हणाले की, कृषि कर्मचारी हे शेतकर्यांपर्यंत पोहचण्यासाठी आपल्या सर्व किटक नाशके विक्रेत्यांचे सहकार्य घेवून खासगी मार्गदर्शन करत आहेत ही जमेची बाजू आहे. किटकनाशक व खतांचा सुरक्षीत वापर करण्यासाठी विक्रेत्यांनीही स्वत:चा फायदा केवळ लक्ष न ठेवता कंपन्यांच्या वाढत्या प्रलोभनांना बळी न पडता शेतकर्याच्या शाश्वत आनंदासाठी ध्यास धरावा. चांगल्या व्यवसायात चांगले यश निश्चित मिळेल तसेच यासाठी दिर्घकाळाचा ग्राहक आपण निर्माण करावा तरच जिल्ह्यातील शेतकर्यांचे सुखाचे क्षण वाढतील.
यावेळी मार्गदर्शन करताना पंडीराव वाबळे म्हणाले की, खतांच्या कायद्याची माहिती व बियाणांचे नमुने कसे काढायचे याविषयी उपस्थितांना विस्तृत मार्गदर्शन केले. वितरक बंधूंनी दर्जेदार उत्पादने आपल्या दुकानातून विक्रीसाठी ठेवावी तसेच चंागल्या दर्जाची किटकनाशके विक्रीसाठी ठेवत शेतकरी बंधूंना माहितीद्यावी असे सांगितले.
यावेळी दलजितसिंग यांनी खतामंधील थेट लाभ हस्तांतरण योजना म्हणजे डायरेक्ट बेनिफिट कसे केले जाते याविषयी मार्गृदर्शन करताना ही योजना पुर्वीही सुरू होती आणि आताही सुरू असून त्याा लाभ घ्यावा असे आवाहन केले.
कार्यशाळेत ही.ए.पवार यांनी कृषीसेवा विक्री केंद्रांनी गुणवत्ता केंद्राबाबत घ्यावयाची खबरदारी व किटकनाशके, बियाणे यांच्या नियंत्रणासाठी केलेल्या विविध कायद्याबद्दल माहिती दिली,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकुश सोनावणे यांनी केले. आभार प्रदर्शन कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत यांनी केले या समारंभात मोहिम अधिकारी बापूसाहेब शेळके यांचे दोन चिरंजीव निखील व निनाद यांनी अनुक्रमे अहमदाबाद आयएमए खरगपूर आयआयटी येथे खुल्या गटातून विशेष प्रवेश मिळवल्याबद्दल या दोघांचा ना. शिवतारे यांचे हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.कार्यशाळेच्या यशस्वी संयोजनासाठी रसायनीक खते विक्रेते संघटनेचे अध्यक्ष शशांक शहा, राजन मामणीया, रंणजीत निंबाळकर यांच्यासह रामभाउ शेळके, गुरूदत्त काळे, बी. बी. मतकर, अजिंक्य पवार, बापू शेळके, श्री. ननावरे सातारा जिल्ह्यातील संघटनेच्या पदाधिकार्यांनी परिश्रम घेतले.
शेतकरी बंधूंना योग्य मार्गदर्शन व ठिबक सिंचन पध्दतीची माहिती आवश्यकः पालकमंत्री शिवतारे
RELATED ARTICLES