सातारा : आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेले मंडई आंदोलन निष्फळ ठरण्याची चिन्हे आहेत. अद्यापही सातार्याचा जादा कार्यभार पुणे जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंता वैशाली अवटे यांच्याकडेच असून या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्या सातार्याकडे फिरकल्या सुध्दा नाहीत. सातारा कार्यालयातून मुंबईत फोनाफोनी झाल्यानंतर प्राधिकरण समितीचे सदस्य सचिव संतोषकुमार यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तत्काळ पूर्णवेळ अभियंता देण्याचे मान्य केले. मात्र मंत्रिमंडळ विस्तारामुळे हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या परवानगीसाठी रखडण्याची दाट चिन्हे आहेत. सातारा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या संगीत खुर्चीचा खेळ अद्याप संपलेला नाही त्यामुळे आ. शिवेंद्रराजे भोसले व त्यांच्या समर्थकांनी मंडई आंदोलन करुन पुढील 10 दिवसात पर्यायी व्यवस्था न झाल्यास कायम स्वरुपी टाळे ठोक आंदोलन इशारा दिला होता. प्रभारी अभियंता वि. ल. कुलकर्णी यांनी सदस्य सचिव संतोषकुमार यांना पत्रव्यवहार करुन झालेल्या आंदोलनाचे गांभीर्य निदर्शनास आणून दिले. संतोषकुमार यांनी तातडीने पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्याशी चर्चा केली. त्यांनी तयारी दर्शवली पण बदल्यांचा हंगाम संपल्याने हा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या टेबलावर किती झटपट पोहोचणार हा वादाचा मुद्दा आहे. वैशाली अवटे प्रभारी अभियंता या कामाच्या व्यस्ततेमुळे सातार्यात पोहोचू शकल्या नाहीत. त्यामुळे आमदारांनी आंदोलन करुनही प्राधिकरण प्रशासनाने पुन्हा कागदी घोडे नाचवले. त्यामुळे प्राधिकरणाला कायमस्वरुपी टाळे लागण्याची वाट बघितली जात आहे काय? असा उपरोधिक सवाल सदरबझारच्या नागरिकांनी केला
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात झालेले मंडई आंदोलन निष्फळ ठरण्याची चिन्हे..
RELATED ARTICLES