म्हासुर्णे ( प्रतिनिधी तुषार माने ) :- खटाव येथे संपन्न झालेल्या खटाव तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धेत श्रीराम विद्यालय म्हासुर्णेच्या विद्यार्थ्यांना घवघवीत यश संपादन केले.१४ वर्षाखालील मुलांच्या गटात १) रुतुराज अजय माने याने उंच ऊडी मध्ये द्वितीय क्रमांक पटकवला.२)श्रेयश गोरखनाथ माने याने ६०० मीटर धावने मध्ये तृतीय क्रमांक मिळवला.१४ वर्षाखालील मुलींच्या गटात १)शुभांगी प्रविण चव्हाण हिने उंच ऊडी मध्ये प्रथम पटकवला.२)कु.प्रियांका चंद्रकांत यमगर हिने उंच ऊडी मध्ये तृतीय क्रमांक मिळवला.३)कु.अक्षदा विलास यमगर हिने २००मीटर धावने मध्ये तृतीय क्रमांक मिळवला.तसेच १७ वर्षाखालील मुलींच्या गटात १)कु.सावित्रा सर्जेराव यमगर हिने उंच ऊडी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला.२) कु.संध्या संतोष माने(पाटील) हिचा उंच ऊडीत द्वितीय क्रमांक मिळवला. वरील खेळाडुपैकी प्रथम व द्वितीय क्रमांक आलेल्या खेळाडुंची सातारा येथे होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धैसाठु निवड झाली आहे .या खेळाडुंना क्रिडा शिक्षक श्री.शेख सर व श्री.केराम सर यांनी मार्गदर्शन केले.सर्व यशस्वी खेळाडुंचे व मार्गदर्शक शैक्षकांचे शिक्षण सल्लागार मंडळाचे चेअरमन महादेव माने,श्री.राजाराम माने,सर्व संचालक मंडळ,तसेच ग्रा.म.सरपंच सचिन माने,ग्रामपंचायत सदस्य तुषार माने,सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.पी.व्हि.हांडे सर ,श्री.राठोड सर,माने,परदेशी सर,शेख सर,म्हमाणे मँडम,केराम सर ,तोरणे सर,व शिक्षकेतर कर्मचारी व म्हासुर्णे गावातील ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
श्रीराम विद्यालय म्हासुर्णेचे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश
RELATED ARTICLES