फलटण : फलटण येथील गोळीबार मैदानाजवळील श्रीराम ट्रेडर्स शोरूममधून ट्रॅक्टर खरेदी करण्याचा बहाणा करून 7 लाख 5 हजाराची फसवणूक केल्या प्रकरणी फलटण पोलीसांनी ट्रॅक्टरसह तीन जणांना अटक केली आहे.
याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, गोळीबार मैदान फलटण येथील श्रीराम ट्रेडर्सचे मालक शिवराज राजेंद्र काटकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित आरोपी सोमनाथ राजाराम बोडरे रा. फौडसिरस ता. माळसिरस, किशोर मनोहर लखन रा. सौरभनगर, भिंगार अहमदनगर व संतोष विठ्ठल अनारसे रा. खामगाव ता. कर्जत यांनी ट्रॅक्टर खरेदी करण्याचा बहाणा करून श्रीराम ट्रेडर्स शोरममधून 1 लाख अदा करून ट्रॅक्टर घेण्याची विनंती फिर्यादीने केली होती. मात्र गोड बोलून संशयितांनी पैसे न भरता पुजा केल्यानंतर पैसे देतो असे सांगून ट्रॅक्टर परस्पर लंपास केला होता. या संदर्भात फलटण पोलीस ठाण्यात संशयितां विरोधात भादवि कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पो.उप नि. मुंढे यांनी करून संशयितांना जेरबध्द केले आहे.