फलटण : गोखळी ता.फलटण येथील जिल्हा बँकेतून मोठा दरोडा टाकण्या चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झाला. शुक्रवारी मध्यरात्री चोरट़्यांनी गोखळी जिल्हा बॅकेचे सेफ्टी ग्रिल तोडुन, दरोड्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी रात्री 1.30 वाजता पेट्रोलिंगच्या दरम्यान, पाचबत्ती चौकात दोघा संशयितांना पकडले असता त्यांनी बँकेत दरोडा घातल्याची कबूली दिली. गोविंद गणपत माने (वय 29, फरांदवाडी, ता. फलटण), दिलीप दशरथ नामदास (वय 27, साठेफाटा, फलटण) अशी आरोपींची नावे असून त्यांच्याकडून दोन एअर पिस्टल, छर्याची पाकीटे, शेगडी स्टॉर्च, स्क्रू ड्राइव्हर, ग्लोज, मास्क व मोटार सायकलच्या चाव्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिस कॉन्स्टेबल विक्रम जयसिंग पिसाळ यांनी ही धाडसी कारवाई केली.
चोरट्यांनी गोखळीच्या जिल्हा बँकेत कटावणीने शटर उचकटून आत प्रवेश केला. शटर उचकटला, सीसीटीव्ही कनेक्शन सोडवले, सायरन व इतर मुख्य कनेक्शन तोडली. पण तिजोरी खूप मोठी असल्याने चोरट़्यांनी चोरी करणे जमले नाही.
सातारा जिल्हा बॅकेची गोखळी येथे शाखा असून या शाखेचा आर्थिक व्यवहार मोठा आहे. बाजार तळ गोखळी येथे बॅकेची शाखा कार्यरत आहे. सुरक्षिततेच्या दुष्टीने या शाखेत असुरक्षितता जाणवत नाही.मुख्य दरवाजा मजबुत आहे, सीसीटीव्हीची सोय आहे पण सायरनचा सतत घोटाळा असतो.
या बॅकेतील सभासदांचा, ठेवीदारांचा पैसा सुरक्षित आहे राञीच्या वेळी चोरट्यांना बॅकेत प्रवेश करणे सोपे झालेले दिसत असून केवळ तिजोरीनेच बॅकेचे पैसे वाचविले. कारण तिजोरी तोडणे अशक्य आहे हे चोरट़्यांच्या लक्षात आल्यावर तेथून चोरट़्यांनी पळ काढला.पण रात्र गस्त वर असणार्या पोलिसांना ही बाब समजली व मग पोलीस निरीक्षक काळे साहेब व टीमने पहाटे गोखळी जिल्हा बॅकेला भेट दिली व बॅक कर्मचारी वर्गाच चोरीची माहीती देताच बॅक शाखाप्रमुख पवार साहेब, कॅशियर, व इतर स्टाफ पहाटे बॅकेत हजार झाले व नंतर गोखळी ग्रामस्थांना सकाळी सकाळी हा सर्व प्रकार समजला. अशा प्रकारे एक मोठ्या चोरीचा प्रयत्न भक्कम तिजोरीमुळे अयशस्वी झाला. या घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पीएसआय काळे करीत आहेत.