Friday, April 19, 2024
Homeताज्या घडामोडीसेवाव्रती पुरस्काराने स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचा गौरव

सेवाव्रती पुरस्काराने स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचा गौरव

तळमावलेः धारावीतील खांबदेव नगर येथे राज्यातील विविध क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्ती आणि संस्थांना राज्यस्तरीय पुरस्कार देवून गौरवण्यात आले. यावेळी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला सेवाव्रती पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. खासदार राहुल शेवाळे, माहिती व जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ अधिकारी संजय चव्हाण, राजकीय विश्‍लेषक व नामवंत पत्रकार महेश म्हात्रे, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, भाजपच्या दिव्या ढोले, वास्तुविशारद डॉ.शांताराम कारंडे, राजन पोटे, धगधगती मुंबईचे संपादक भीमराव धुळप व अन्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टला सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. स्पंदन चॅरिटेबल च्या वतीने हा पुरस्कार ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे व सहकारी सागर डाकवे यांनी स्विकारला.
स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टने आतापर्यंत नाम फाऊंडेशनला मदत, अक्षरश्री उपक्रमातून केरळ पुरग्रस्तांना मदत, अक्षर गणेश उपक्रमातून माजी सैनिक व आर्मी बॅटल कॅज्युअल्टीजला मदत, एक वही, एक पेन उपक्रमांतर्गत शालेय साहित्य वाटप, ग्रंथतुलेतून जि.प.शाळेला पुस्तके भेट, माणूसकीच्या वह्या या उपक्रमांतर्गत जि.प.शाळा जिंती येथे संपूर्ण शालेय साहित्य भेट, जि.प.शाळा कुठरे-जांभूळवाडी येथे महापुरुषांच्या प्रतिमांचे वितरण, एक ओंजळ धान्य अनाथांसाठी या उपक्रमातून तांदूळ, डाळ, धान्याचे वाटप, बॅग व संगणकसाठी आर्थिक सहाय्य, जि.प.शाळेत मोफत वह्या वाटप, विनामुल्य बोलक्या भिंतींचे रेखाटन, ऊसतोड मजूरांना शाल वाटप, दिवाळी अंक स्पर्धा, प्राईड ऑफ स्पंदन अ‍ॅवार्ड, सॅल्युट कार्ड स्पर्धा, किल्ले बनवा स्पर्धा, गणेशोत्सव वार्तांकन स्पर्धा, एक दिवा जवानांसाठी, अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर (भाऊ) यांची 83 चित्रे रेखाटून वाढदिवसाच्या शुभेच्छा, 16 बाय 2 आकाराचे वारीचे पोस्टर रेखाटून वारकर्‍यांना शुभेच्छा, कॅलीग्राफीतून जवानांना सलाम, मान्यवरांचे स्वागत शाल श्रीफळ ऐवजी पुस्तकाने, गणेशमंडळास भेटी देवून मानपत्र देवून सत्कार असे अनेक नाविण्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत.
या कार्यक्रमाला नगरसेवक वसंत नकाशे, श्रीकांत शेट्ये उपविभागप्रमुख राजेंद्र सुर्यवंशी, समाजसेवक दिलीप कटके, युवासेना अधिकारी प्रवीण जैन, शाखाप्रमुख किरण काळे, आनंद भोसले, प्रकाश सावंत, उपविभाग समन्वयक गणेश खाडे, महादेव शिंदे, मनसेचे शाखाध्यक्ष शशिकांत शिरसेकर, संदीप कवडे, संदीप कदम, पत्रकार महेश कवडे, सागर बोबडे, संतोष कदम, राम शिंदे, संतोश मालुसरे, संतोष पोटे यांच्यासह खांबदेव तरुण मित्र मंडळ, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीर कमिटीचे पदाधिकारी, सह्याद्री प्रतिष्ठानचे सचिन रामुगडे, युवा तरंगचे नवनाथ चाळके, आदि मान्यवर उपस्थित होते.धगधगती मुंबई चे संपादक भीमराव धुळप यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन संतोश लिंबोरे यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular