कोरेगाव: संगीत रंगभूमीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणार्या स्वरराज छोटा गंधर्वांना त्यांच्याच रचनेतील एक नाट्य गीत गावून मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षा किर्ती शिलेदार यांनी अनोखी संगीतमय सुमनांजली अर्पण केली.
कोरेगावचे थोर सुपुत्र व संगीत रंगभूमीवरील ख्यातनाम गायक – अभिनेते स्वरराज छोटा गंधर्व यांचा 21 वा स्मृतिदिन रविवारी शिवकृपा मंगल कार्यालयात विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला, त्यात स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्कार वितरणानंतर किर्ती शिलेदार यांनी आपल्या खुमासदार शैलीत स्वरराजांनी गायलेल्या गीताचे सादरीकरण करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
दिवसभर चाललेल्या या स्मृती गौरव कार्यक्रमात सकाळी सोनेरी ग्रुप व कोरेगांव नगर विकास कृती समिती आयोजित शालेय गीत गायन स्पर्धा पार पडल्या, जिल्ह्यातील स्पर्धक यात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. श्रीकृष्ण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष दिलीप वलियाविट्टील, प्रा. बाळासाहेब भोसले, सचिनभाऊ बर्गे, अभिजीत बर्गे, इनरव्हिलच्या सेक्रेटरी संजीवनी मोरे, स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र गोसावी, बापूसाहेब भोसले, सी. आर. बर्गे आदींच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ झाला.
दुपारी जिल्ह्यातील नामवंत गायकांच्या संगीत मैङ्गीलीचे आयोजन करण्यात आले होते, यात स्वरराज छोटा गंधर्व स्मृती पुरस्काराने गौरविलेल्या कलाकारांनी आपली कला सादर केली. सायंकाळी पुण्याच्या बाल गंधर्व संगीत रसिक मंडळाच्या वतीने नाट्यसंगीत व भक्तीसंगीताची मैङ्गल झाली, त्यात सुरेश साखवळकर, छोटा गंधर्वांची कन्या सुलभा सौदागर, मुकुंद गोडबोले, रविंद्र कुलकर्णी हे कलाकार सहभागी झाले होते, त्यांना तबल्याची साथ विनय कशेळकर यांनी तर ऑर्गनची साथ हिमांशु जोशी दिली.
सायंकाळच्या सत्रात स्पर्धांचा पारितोषीक वितरण व गुणगौरव पुरस्कारांचे वितरण किर्ती शिलेदार यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पुण्यातील प्रसिद्ध गायक, आकाशवाणी कलाकार मुकुंद गोडबोले यांना स्वरराज छोटा गंधर्व गुणगौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. तर छोटा गंधर्व स्मृति सन्मानाने भजन गायक दत्तात्रय देशमुख (मेढा), सोलो हर्मोनियम वादक आबासाहेब परकाळे (बारामती), मृंदगवादक विक्रम कणसे (अंगापूर), तबला वादक शिवाजी जावळे (वेचले), बासरी वादक प्रकाश भंडारे (वडूज), रणशिंग वादक उध्दव गुरव (तांदुळवाडी) यांनाही गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. राजेंद्र गोसावी यांनी केले, यावेळी डॉ. श्रीनिवास कात्रे, ह.भ.प. आझाद महाराज गुजर, पश्चिम महाराष्ट्र वारकरी महामंडळाचे अध्यक्ष मदन महाराज कदम यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोरेगाव शाखेचे अध्यक्ष माणिकराव ज. भोसले, कार्याध्यक्ष सी. आर. बर्गे, डॉ. शितल गोसावी, कोरेगांव नगर विकास कृती समितीचे राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, मिलींद बर्गे, अधिक बर्गे, नंदकुमार माळवदे, राजन धर्माधिकारी, अशोक साळुंखे यांनी परिश्रम घेतले.
स्वरराजांना किर्ती शिलेदारांची संगितमय सुमनांजली
RELATED ARTICLES