Friday, March 29, 2024
Homeठळक घडामोडीगतवर्षात जि. प. चे शिक्षण, आरोग्य, बांधकामाबाबत उल्लेखनीय काम : डॉ. कैलास...

गतवर्षात जि. प. चे शिक्षण, आरोग्य, बांधकामाबाबत उल्लेखनीय काम : डॉ. कैलास शिंदे

नवीन वर्षापासून मुलांच्या गुणवत्तेसाठी विकास चाचणी कार्यक्रम घेणार
सातारा : सातारा जिल्हयात 7732 मुले शाला बाह्य आढळली असून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम सुरू झाले आहे. 1 जानेवारी 2019 पासून जिल्हयातील 1 लाख 32 हजार मुलांच्या गुणवत्तेची विकास चाचणी कार्यक्रम घेतला जाणार आहे. अशी माहिती सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
व्हिजन 2019 डोळ्यासमोर ठेवत शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, जलसंवर्धन, घरकुल बांधणी या पाच विभागात सक्रिय योगदान देण्याचे संकेत शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिले. ते पुढे म्हणाले, सातारा जिल्ह्यात 178 ग्रामपंचायतीकडे कचरा निर्मूलनासाठी डंप यार्ड आहे. तसेच सातारा शहरालगतच्या शाहूपुरी, कोंडवे, सैदापूर, दरे बुद्रुक या गावांची आठवड्यातून एकदा बैठक घेउन कचर्‍यापासून खतनिर्मिती करणारे वीस लाख रुपये किंमतीचे सयंत्र दिले जाणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हयातील 2762 शाळांपैकी2210 शाळांचा सर्वे झाला असून 7732 मुले शाला बाह्य आहेत . सर्वात जास्त मुले कराड -1348 व कोरेगाव तालुक्यात 1053 इतके आहेत. सातारा जिल्हयातील साखर कारखान्यांना साखर शाळा सक्रीय करण्याच्या सूचना देणार असल्याचे शिंदे यांनी सांगत वाडया वस्त्या तसेच शेतातील खोपी पर्यंत शाला बाह्य मुलांना शिकवण्यासाठी इच्छुकांनी पुढे यावे असे सांगितले. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात 75 टक्के गुण मिळावे याकरिता गुणवत्ता वाढ प्रकल्प 1 जानेवारी ते 28 फेब्रुवारी दरम्यान राबवण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याला विधार्थ्यांची घटक चाचणी घेण्यात येणार आहे.
घरकुल योजनेसाठी सातारा जिल्हयाला 2018-19 साठी 11738 घरकुलांचे उदिष्ट होते. एकूण 12000 घरकुलांपैकी 8824 घरकुले पूर्ण झाली .891 लोकांना जमीन उपलब्ध करून देण्यात आली. फलटण तालुक्यातील हणमंतवाडी येथे 68 कुटुंबांना शासनाच्या वतीने जमीनी देउन त्यावर घरे बांधून देण्यात येणार आहेत. तसेच 2011 पूर्वीची सातारा जिल्हयातील 10126 अतिक्रमणे नियमित करणार असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. याशिवाय बेटी बचाव, माझी कन्या भाग्यश्री, प्रधानमंत्री मातृ वंदना योजनांची माहिती शिंदे यांनी यावेळी दिली.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular