म्हसवड: प्रख्यात तमाशा कलावंत राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांचा म्हसवडनगरवासिय व माण तालुका पत्रकार संघटणेच्या वतीने राष्ट्रीय कलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल म्हसवड येथे नुकताच सत्कार करण्यात आला.
म्हसवड सिध्दनाथ रथोउत्सवा निमित्त कार्यक्रमात मुख्याधिकारी पंडीत पाटील, माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी, तेजसिंह राजेमाने, शंकरशेठ विरकर, पत्रकार पोपट बनसोडे, धनंजय पानसांडे, विजय भागवत, सचिन मंगरूळे, शिवशंकर डमकले यांनी लोककलावंतांचा सत्कार आयोजित केला होता.
लोककला जतन करण्यासाठी सलग पाच पिढ्या वाहून घेतलेल्या व नुकताच राष्ट्रीय स्तरावरील मानाचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ. मंगला बनसोडे व सिनेस्टार नितीन बनसोडे यांचा युवराज सुर्यवंशी मुख्याधिकारी पंडीत पाटील पोपट बनसोडे यांनी पैठणी, माणदेशी घोगडं शाल, श्रीफळ व बुके देऊन सत्कार केला.
आमच्यासाठी कला हेच जीवन असून रसिक प्रेक्षक हेच आमच्यासाठी मायबाप असल्याचे राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या मंगला बनसोडे यांनी स्पष्ट केले. लोककला जिवंत ठेवून जतन करण्यासाठी मायबाप प्रेक्षकांनी यापुढे सहकार्य करावे असे आवाहन केले.
म्हसवड मध्ये झालेला कलेचा आदर हा राष्ट्रपती पुरस्कार एवढाच ताकत देणारा ठरेल असा विश्वास सौ. बनसोडे यांनी व्यक्त करून त्यापुढे म्हणाल्या लाखो भाविक भक्तांचे श्रध्दास्थान श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरीचा आशिर्वाद लाभल्यास आपण तमाशा या लोककलेच्या माध्यमातून शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा करत राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.