सातारा : सिलबंद असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बॉटलमध्ये किड व कचरा आढळून आला असून संबंधित कंपनी विरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी पाचगणी (ता.महाबळेश्वर) येथील हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. याबाबत निवेदन आज राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती सातारा जिल्हा शाखेचे वतीने जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पाचगणी ता.महाबळेश्वर येथील हॉटेल व्यावसायिकास डिस्ट्रीब्युटर मार्फत सिलबंद पिण्याच्या बॉटल विक्रीसाठी विकत घेतल्या होत्या. मात्र सिलबंद पाण्याच्या बॉटलमध्ये किडे व कचरा दिसून आला असून त्यामुळे लोकांच्या धोका पोहचू नये म्हणून याची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक लिपारे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.