घडशी व वडार समाजबांधवासह फर्टीलायझर्स असोसिएशन मताधिक्क्यासाठी सरसावले
सातारा : राष्ट्रवादी, कॉग्रेस व मित्रपक्ष यांच्या आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना जिल्हयातील विविध संघटनांकडून उत़्फुर्तपणे पाठींबा मिळत आहे. आज अखिल भारतीय घडशी समाज संघ, महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ आणि कराड तालुका सिडस फ़र्टिलायझर्स न्ड पेस्टी साईडस असोसिएशन या संघटनांनी लेखी स्वरुपात आपला पाठींबा जाहिर केला असुन सलग तिस-या वेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना संसदेत प्रचंड बहुमताने पाठविण्याचा निर्धार केला आहे.
याबाबत कराड तालुका सिडस फ़र्टिलायझर्स न्ड पेस्टी साईडस असोसिएशन या संघटनेने प्रसिध्दीपत्रकाद्वारे महाराज साहेबांना पाठींबा दिल्याचे जाहिर केले आहे. कराड तालुक्यासह ठिकठिकाणच्या किटकनाशके, बी – बियाणे, आणि खत विक्रेत्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आजवर वेळोवेळी खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी सहकार्य केल्याने त्यांचे विविध प्रश्न मार्गी लागले असुन भविष्यातील नियोजनासाठी महाराजांचे सहकार्य लाभावे व त्यांच्या दुरदृष्टीचा संघटनेस उपयोग व्हावा म्हणून संघटनेतर्फ़े हा पाठींबा देत असल्याचे संघटनेच्या पदाधिका-यांनी म्हटले आहे.
दरम्यान अखिल भारतीय घडशी समाज संघ या संघटनेने या निवडणूकीत खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या नेतुत्वावर विश्वास ठेवत या निवडणूकीतील यशासाठी पूर्णपणे पाठीशी राहण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेचे राज्य अध्यक्ष अनिल शंकर पवार (रा. धुळदेव ता. फ़लटण) यांनी म्हटले आहे. घडशी समाजाच्या पूर्व इतिहासात शिवछत्रपतींच्या घराण्याने वेळोवेळी आशिर्वाद दिल्याच्या नोंदी आहेत. याशिवाय राजघराण्याशी हा समाज कायम एकनिष्ट राहिला आहे. तसेच विकासाभिमुख नेतृत्व म्हणून महाराज साहेबांनी केलेले कार्य उल्लेखनिय असेच आहे. समाजबांधवांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन लाभावे व शासकीय स्तरावर समाजाचे प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून त्यांचे नेतृत्व पुन्हा लोकसभेत निवडून जावे या उद्देशाने समाजातर्फ़े पाठींबा देत असल्याचे संघाचे उपाध्यक्ष किशोर वाडेकर, शरद धुमाळ, खजिनदार प्रदिप वाडेकर, कार्यध्यक्ष शिवाजी कदम, प्रितम धुमाळ, सुनिल पवार, हणमंतराव धुमाळ, अशोक काळे, आदींनी प्रसिध्दीपत्रकात वर सह्या करुन म्हटले आहे.
याशिवाय महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ यांच्यावतीनेही खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना पाठींबा जाहीर केला आहे. राज्य कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश सचिव प्रकाश सातपुते, माणिकराव ठाकरे, बाळासाहेब थोराव, प्रकाशराव आव्हाडे, सत्यजित पाटील, अभय छाजेड, यांच्या मार्गदर्शानाखाली महाराष्ट्र राज्य वडार समाज संघाने संपुर्ण राज्यातील लोकसभा निवडणूकीसाठी कॉग्रेस, राष्ट्रवादी व मित्रपक्ष आघाडीला जाहिर पाठींबा दिला आहे. त्यानूसार आजओजी उंब्रज येथील सभेत संघटनेचे राज्य अध्यक्ष मुकुंदराव पोवार, जिल्हाध्यक्ष रामचंद्र नलवडे, राज्य नेते दिलिप कु-हाडे, शांताराम नलवडे, रविंद्र माने, विलासपूरचे सरपंच बाळासाहेब पिसाळ, कराड तालुका अध्यक्ष सोमनाथ पवार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय पोवार, आदींच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांना लेखी पत्र सादर करुन समाजाचा पाठींबा जाहिर केला. या पाठींबा पत्रावर सुनिल फ़डतरे, मारुती पोवार, सोमनाथ धोत्रे, सचिन प्रकाश जाधव, सुनिल माने अशोक पोवार, विजय पोवार, प्रकाश नलवडे, संतोष नलवडे, सागर नलवडे, रमेश विठठल, सुरज पोवार, शरणाप्पा विठ्ठल, किशोर जाधव, भरत देवराषी, लक्ष्मण शिंत्रे, हणमंत शिंदे. कुमार धोत्रे. संतोष फ़डतरे. शंकर पिसाळ, संजय बावधन, चंद्रकांत पोवार आदींच्या सह्या आहेत.
विविध संघटनांचा उदयनराजेंना जाहिर पाठींबा
RELATED ARTICLES