कराड: (रेश्मा जाधव यांजकडुन) भाजी मंडईत भाज्यांचे दर कडाडले असुन ते सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेले आहेत त्यामुळे सर्व सामान्य ग्राहक महिला यांचे बजेट कोलमडले आहे.
गेल्या चार दिवसापासुन भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. पाच दहा रूपयांची कोंथिंबीर पेंडीने पंचवीस ते तीस रूपये पेडींने दर गाठला आहे. मेथीची पेंडी डोईजड झाली आहे एका पेंडीचा दर पन्नास रूपये झाला आहे. ढब्बु मिरची 120 रूपये किलोने विकली जात आहे. तर सर्व सामान्याचे वांगे 120 रूपये किलो झाले आहे. तर शेवग्याची पेंडी आता वजनावर विकली जाऊ लागली आहे. शेवग्याचा किलोचा दर 160रूपये निघाला आहे. काकडीने 90 रूपये किलो दर गाठला आहे. तसेच गवारी , भंेंडी, कोबी, लॉवर, वाटाणा,दोडका, घेवडा, टोमॅटो, हिरवी मिरची बरोबरच इतर पालेभाज्यांचे दर भरमसाठ वाढल्याने ग्राहक हवालदिल झाल्याचे चित्र भाजी मंडई परिसरात होते.
भाजी खरेदीसाठी आलेला ग्राहक गृहीणी यांनी बाजारहाट करण्यासाठी आणलेले पैसे पुरेशे न पडल्याने नियोजनातील खरेदी त्यांना करताच आली नाही.