कोयना परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

 पाटण : आज दुपारी 1 वाजुन 45 मिनिटांनी कोयनेमध्ये 2.8 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का जाणवला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आज दि.28 गुरुवार रोजी दुपारी 1 वाजुन 45 मिनिटांनी कोयनानगर जवळील गोषटवाडी गावाच्या नैऋत्य दिशेला 5 किमी अंतरावरती अतिसौम्य 2.8 रिश्टर स्केलचा भुकंपाचा धक्का जाणवला. या भुकंपाचा केद्रंबिंदू कोयनेपासून 9.6 किमी अंतरावरती असुन केद्रंबिंदुची खोली जमिनीमध्ये 7.0 कि मी आहे. हा भुकंप फक्त कोयनेसह परिसरात जाणवला. तसेच भुकंपाने कोणतीही जिवीतहानी व वित्तहानी झालेली नाही अशी माहिती प्रशासनाने दिली.