आदित्य देशमुख जिल्हास्तरावर नेमबाजीत सुवर्ण पदक

परळी : महाराजा सयाजीराव विद्यालयाचा विद्यार्थी रजपूत शुटींग अकँडमी चा शुटर आणि भाटमरळी गावचा सुपुत्र आदित्य विठ्ठल देशमुख याने सातारा जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून आयोजित शालेय क्रिडा स्पर्धेत 10 मीटर ओपन साईट रायफल शूटिंग स्पर्धेत 14 वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावून गोल्ड मेडलसह विजेतेपद मिळविले तसेच दर्शन संतोष देशमुख याने 10मीटर पिस्तूल शुटिंग प्रकारात तिसरा क्रमांक मिळवला
या यशाबद्दल सातारा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा जिल्हा बँकेचे चेअरमनश्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जाधव सर उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक सर्व शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी अभिनंदन केले
तसेच जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव चव्हाण, भाटमरळी गावचे सरपंच कविता दिनकर देशमुख, उपसरपंच बाळासाहेब जाधव, श्री आणि देशमुख परिवार भाटमरळीचे सर्व ग्रामस्थ व नातेवाईक यांनीही अभिनंदन केले आणि आदित्य याची कोल्हापूर विभागीय स्पर्धेत निवड झाली आहे त्याबद्दल त्याला उज्ज्वल यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.