कोरोना योद्धा डॉ. निलेश माने यांची आरोग्य सेवा कौतुकास्पद _किशोर काळोखे

 

 

 

परळी वार्ताहर;

गेल्या सात महिन्यापासून वेळ काळ न पाहता स्वतःच्या जीवाची परवा न करता परळी पंचक्रोशीतील गावातील सर्वसामान्य जनतेची कोरोना सारख्या महामारीच्या बिकट काळात केलेली सेवा कौतुकास्पद आहे.असे प्रतिपादन भावनोप्चर तद्न्य किशोर काळोखे यानी केले. पांगारे गावचे सामाजिक कार्यकर्ते कृष्णा जाधव व गोपीचंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीतील गावातील सरपंच व प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीत डॉ. नीलेश (शिवकुमार) माने व सौ.डॉ. सुचेता नीलेश माने या दाम्पत्यांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जाहीर सत्कार सोहळा डॉ. माने यांच्या गजवडी येथील रुग्णालयात घेण्यात आला.

या सत्कार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून किशोर काळोखे सर उपस्थित होते. यावेळी काळोखे यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. श्री व सौ.डॉ.माने दाम्पत्यांच्या सेवेची माहिती करून त्यांची सेवा अशीच पुढेही भागातील लोकांना लाभावी अश्या शुभेच्छा कृष्णा जाधव यांनी डॉ.माने दाम्पत्याबद्दल गौरोउद्धगार काढताना म्हणाले गेल्या काही महिन्यापासून कोरोना या महामारीच्या रोगाने संपूर्ण जगात हाहाकार माजवला असताना अश्या वाईट काळात जे डॉक्टर कोरोना योद्धा म्हणून पुढे सरसावले, आपल्या जीवाची परवा न करता अहोरात्र गोरगरीब लोकांची सेवा केली व आपली डॉक्टरी पेशाला शोभेल असे कार्य केले अश्या योध्यानचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा सत्कार सोहळा घेण्यात आला जेणे करून भागातील इत्तर डॉक्टरांना देखील प्रेरणा मिळावी आणि भागातील जनतेला सेवा द्यावी तसेच परळी पंचक्रोशीत जे लोक कोरोना बाधित म्हणून सापडतील त्यांना खावलीला न हलवता पहिल्या व दुसऱ्या स्टेजवरच्या रुग्णांना परळी खोऱ्यातच कोरोना सेंटर उभारून उपचार दयावे अशी मागणी स्थानिक आमदार व जिल्हाधिरी यांच्याकडे करणार आहोत असे मत श्री कृष्णा जाधव यांनी मांडले, यावेळी गजवडी गावचे पोलीस पाटील अमीन पटेल, पांगारे गावचे पोलीस पाटील तानाजी पवार, ठोसेघर गावचे सरपंच महादेव अण्णा, सरपंच जिन्सा लोटेकर, उत्तम लोटेकर, संतोष लोटेकर, श्रीरंग देटे , बबन देटे, प्रशांत सळूखे, संदीप कदम, हे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.