सातारा : लताा मंगेशकर या महाराष्ट्रतच काय तर भारतात माहिती नाहीत असे कोणीही नसून त्या शतकातील चमत्कारच आहेत असे गौरउद्गार महाराष्ट्रातील प्रसिध्द चित्रपट समीक्षक व केसरीचे वृत्त संपादक स्वप्निल पोरे यांनी दीपलक्ष्मी पतसंस्था, शाखा गोडोलीच्या 14 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या लता मंगेशकर अमृत स्वरांचा अमृतमहोत्सव या विषयावर व्याख्यान कार्यकमात काढले. ं
कार्यक्रम प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमास बाळासाहेब तावरे, रमणलाल शहा, प्रसिध्द साहित्यिक व जोतिष विशारद, शिरीष चिटणीस संस्थापक चेअरमन दीपलक्ष्मी पतसंस्था, प्रविण जोशी, कृष्णराव कदम, आप्पा शालगर, श्रीकांत देवधर, सुनिल मोरे, विनायक भोसले, व्यवस्थापक, अभिनंदन मोरे, शाखाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतानाा स्वप्निल पोरे म्हणाले, लता मंगेशकर ह्या 1942 सालापासून गात असून त्यांच्या गाण्याला आज 75 वर्षे झाली आहेत. या काळात अनेक गायिका आल्या व गेल्या परंतू त्यांचे युग काही मावळले नाही. सुरुवातीचा काळ हा बदलाचा होता. त्याआधी नाटक हे सर्व स्तरातून पाहिले जात होते. परंतू चित्रपट सृष्टीमुळे मराठी रंगभूमीला लोक विसरु लागले. चित्रपट गीतांमुळे हिंदी चित्रपट तुफान लोकप्रिय होवू लागले.
भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळाले व त्याच वर्षी लता मंगेशकर यांनी आप की सेवा मे या हिंदी चित्रपटात गीत गायिले व यातूनच स्वातंत्र्य व लता मंगेशकर युगाचा प्रारंभ झाला यानंतर त्यांनी कधीही मागे वळूण पाहिले नाही.
त्यांनी अंदाज, जिद्दी, बडी बहु या चित्रपट गीतांमध्ये गीत गाउन चित्रपटट यशस्वी केले. तसेच बरसात ही फिल्म त्याच्या आयुष्यातील एक अतिउच्च शिखर ठरले. अनेक शतकांतून जन्माला येणारा स्वर त्यांना लाभला होता. लता मंगेशकरांच्या आधी फिल्म ह्या संगीतामुळे ओळखल्या जात होत्या परंती त्यानंतर त्या गीतांनी ओळखल्या जावू लागल्या. संगीतकारांच्या पिढ्या आल्या व गेल्या परंतु लताबाईंचे गीत घरा घरात पोहोचले त्यांचा स्वर व्यापक झाला असून त्यांनी हजारो गीते गायली व अजरामर केली.त्या आयुष्यभर तत्वाशी झगडल्या व मूलांना शेवटपर्यंत जोपासले अशा या महान व्यक्तींना भारत देश विसरु शकणार नाही असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमात बाळासाहेब तावरे, शिरिष चिटणीस, रमणलाल शहा यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी कवी ननावरे लिखीत शब्द फुलांची परडी या कवितासंग्रहासाठी त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शिरीष चिटणीस यांनी केले. सूत्रसंचालन विनायक भोसले यांनी केले व आभार अभिनंदन मोरे यांनी केले.
लता मंगेशकर ह्या शतकातील चमत्कार : स्वप्निल पोरे ; दीपलक्ष्मी पतसंस्था, शाखा गोडोलीच्या 14 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्य कार्यकमात काढले गौरवोद्गार
RELATED ARTICLES