Sunday, May 18, 2025
HomeUncategorizedबार्टीच्यावतीने कुशल महाराष्ट्र मेळाव्याचे आयोजन

बार्टीच्यावतीने कुशल महाराष्ट्र मेळाव्याचे आयोजन


सातारा : राज्यात कुशल विद्यार्थ्यांबरोबर कुशल नागरिकांची संख्या वाढावी, या कुशलतेच्या जोरावर नागरिकांना रोजगार मिळावेत आणि त्यातून राज्याची प्रगती व्हावी या उद्देशाने राज्या सरकारच्या न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात बार्टीच्यावतीने येत्या मंगळवार दि. 7 रोजी कुशल महाराष्ट्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यानगर सैदापूर तालुका कराड जिल्हा सातारा येथील सद्गुरु गाडगे महाराज महाविद्यालय या ठिकाणी सकाळी 10 वाजल्यापासून सदर मेळावा होणार आहे. मेळावा सर्वांसाठी विनामुल्य आणि खुला असेल अशी माहिती बार्टीचे महासंचालक राजेश ढाबरे यांनी कळविली आहे. 
राज्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री राजकुमार बडोले हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील तर राज्यमंत्री दिलीप कांबळे हेही यावेळी उपस्थित राहणार आहेत. 
राज्य शासन व बार्टीच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध योजना व कार्यक्रमांची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात येईल. 
या मेळाव्यासाठी बार्टी बरोबरच उद्योजकता विकास व कौशल्य विकास क्षेत्रातील बाटींमार्फत प्रशिक्षण देणार्‍या विविध नामवंंत संस्था, राज्याचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आर्थिक विकास महामंडळ, महाराज्य राज्य खादी ग्रामोध्दोग महामंडळ, पुण्यश्‍लोक अहिल्याबाई होळकर शेळी व मेंढी पालन महामंडळ, नाार्ड जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजक विकास केंद्र यांचेही सहकार्य लाभले आहे. 

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular