Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीमहाबळेश्‍वर बस स्थानकाला अवकळा ; आगारप्रमुखांना बघायला वेळ नसल्याने नाम फलकाच्या झाल्या...

महाबळेश्‍वर बस स्थानकाला अवकळा ; आगारप्रमुखांना बघायला वेळ नसल्याने नाम फलकाच्या झाल्या चिंध्या

महाबळेश्‍वर : महाराष्ट्राचे  नंदनवन म्हणुन प्रसिध्द असेलेल्या महाबळेश्‍वर या पर्यटन स्थळाला निसर्गाचे वरदान लाभले आहे पहावे तिकडे निसर्ग सौदर्य डोळयात भरते हे सौदर्य अबाधित रहावे या साठी येथील व्यवसायिक आपली दुकाने इमारती बंगले घरे सुशोभित करून हातभार लावत असतात पंरतु येथील बसस्थानक मात्र याला अपवाद आहे. इमारतीचे सौदर्य नव्हे तर आपल्या दारिद्रयाचे प्रदर्शन करण्यात बस स्थानकाचा कायम पुढाकार असतो बस स्थानकाचा केवळ फलक पाहिल्या नंतर याची प्रचिती आल्या शिवाय रहात नाही.
चार महिने अतिवृष्टीने निसर्ग संपन्न असलेल्या महाबळेश्‍वरचा चेहरा मोहराच बदलुन जातो इमारतीचा बाहेरचा रंग काळपट होवुन जातो आत बुरशीने भिंत्ती खराब होतात फर्निचर खराब होते पाउस उघडताच महाबळेश्‍वरचा चेहरा बदलण्याचा प्रयत्न सुरू होतात दोन ते तिन आठवडयात सर्वत्र साफ सफाई रंग रंगोटीची देखभाल दुरूस्तीचे कामे सुरू असतात ही कामे पुर्ण झाल्या नंतर महाबळेश्‍वर पुन्हा सजुन पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज होते परंतु शहराच्या मध्यवर्ती भागात असलेले बसस्थानक मात्र तशाच अवस्थेत सेवेसाठी हजर असते ज्या बसस्थानकाच्या जीवावर आपली रोजी रोटी सुरू आहे त्या बसस्थानकाकडे बघायला आगार प्रमुखा पासुन ते बसच्या वाहकापर्यंत कोणालाही वेळ नाही त्यामुळे बस स्थानकाला अवकळा आली आहे.बस स्थानकाच्या नाम फलकाच्या चिंध्या झाल्या आहेत याच चिंध्याखाली उभे राहुन आगार प्रमुख मोबाईल वर बोलत उन खात आहेत परंतु त्यांचे चिंध्या झालेल्या बस स्थानकाच्या फलकाकडे लक्ष जात नाही रोज अनेक बसेस या स्थानकात येतात जातात परंतु कोणालाही या चिंध्या झालेल्या फलकाची पर्वा नाही सातारा येथील वरीष्ठ अधिकारी आगाराला भेट देण्याच्या नावाखाली आपली सहल साजरी करतात. परंतु बस स्थानकाच्या दारिद्रयाचे प्रदर्शन जगा समोर करीत असलेल्या चिंध्या झालेला फलक बदलावा असे कोणालाही वाटत नाही जाहीरात करून फलक बसविण्यासाठी अनेक जण तयार आहेत परंतु त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे या पुर्वी आयडीया सेल्युलर या कंपनीने बस स्थानकाचा नाम फलक लावला होता आताही काही कंपन्या तयार आहेत परंतु आगार प्रमुख या संदर्भात तोंड उघडायला तयार नाहीत. नाम फलक नसल्याने सहली साठी आलेले अनेक विद्यार्थ्यांना आपण कोठे आलो आहोत हे समजतच नाही. अनेक प्रवासी अथवा पर्यटकांना विचारावे लागते की या हे कोणत्या शहराचे बस स्थानक आहे. तरूण तडफदार नुतन आगार प्रमुखांनी या बस स्थानकाचे सुशोभिकरण करून चेहरा बदलावा व महाबळेश्‍वरच्या नाव लौकीकात भर घालावी अशी मागणी शहरातील नागरीकातुन व प्रवासी वर्गातुन होत आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular