Monday, May 19, 2025
Homeठळक घडामोडीरिपाईच्यावतीने वृक्षाचा दक्षक्रिया विधी

रिपाईच्यावतीने वृक्षाचा दक्षक्रिया विधी

सातारा : रिपाई मुस्लिम अल्पसंख्याक आघाडी सातारा जिल्हा यांच्यावतीने शाहूपुरी येथील आयटीआय रोडवर करण्यात आलेल्या वृक्षतोड प्रकरणी आज पदाधिकार्‍यांनी वृक्षतोड रोखण्यासाठी व दोषीवर कारवाई करावी म्हणून तोडलेल्या झाडाची दक्षक्रिया विधी पार पाडला.
जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. 20 नोव्हेंबर रोजी गोडोली येथील त्रीमुर्ती कॉलनीत एका धनदांडग्या व्यक्तीने वृक्षतोड करुन प्रशासनाला ठेंगा दाखवला, वास्तवीक वृक्षतोड करणार्‍या व्यक्तीवर 24 तासाच्या आत गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे. तसेच वृक्षतोड करणार्‍यांना पाच वृक्ष लावून संगोपन करण्याची जबाबदारी निश्‍चित करावी. म्हसवे हद्दीत नदीकाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करण्यात आली आहे. वीज वाहिनीच्या अडथळ्याच्या नावाखाली वृक्षतोड करण्यात येत आहे. ही बाबही गंभीर आहे. याची दखल घेवून वृक्षतोड थांबण्यात यावी. यावेळी रिपाइ जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, मुस्लीम अल्पसंख्यक आघाडी जिल्हाध्यक्ष फारुख़ पटणी, महिला सघटीका आयेशा पटनी, साईनाथ खंडागळे आदी उपस्थित होते.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular