सातारा : सातारा शहरातील कमानी हौदाजवळील ओढ्याजवळील पुरुषासाठी असलेले स्वच्छतागृह असून अडचण नसून खोळंबा असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सध्या या स्वच्छतागृहाची पडझड मोठ्या प्रमाणात झाली असून भिंतीही पूर्णपणे कोसळल्या आहेत. त्याच परिस्थितीत नागरिक या स्वच्छता गृहाचा वापर करीत आहेत.
सातारा शहरातील कमानी हौद, शेटे चौक, राजवाडा, पोवई नाका येथील स्वच्छतागृह दुर्गंधी मुक्त करुन स्वच्छतेचा श्री गणेश करावा अशी मागणी होत आहे. केवळ तात्पुरत्या स्वरुपात स्वच्छतागृह (मुतारी) यांची डागडुजी न करता स्वच्छतागृहाचे नव्याने नूतनीकरण करावे. सातारा पालिकेच्या नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, आरोग्य सभापती वसंत लेवे, मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी तातडीने सातारा शहरातील दुरावस्था झालेल्या स्वच्छतागृह (मुतारी) यांचा अधिकार्यामार्फत सर्व्हे करुन सातारा शहरातील नागरिकांना चांगले आरोग्य देण्यासाठी सोयी, सुविधा पुरविण्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
(छाया : प्रकाश वायदंडे)