सातारा : मनरेगा योजनेतंर्गत पाटण तालुक्यात मार्च 2018 अखेर तालुक्यातील 50 गांवामध्ये स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तसेच ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची कांमे पुर्ण करण्याचे उद्धीष्ट आपण ठरविले असून त्यानुसार 50 गावातील ही कामेही प्रस्तावित केली आहेत.50 गावातील हे उदीष्ट पुर्ण करण्याकरीता या योजनेमध्ये सहभागी असणार्या सर्व यंत्रणांनी पुढाकार घ्यावा तसेच या योजनेमध्ये कामे करायच्या गावांमधील वाडीवस्तीमधील सर्व ग्रामस्थांना गटतट पक्ष न पहाता सहभागी होवून त्यांनी आपल्या गावाचा विकास साधून घेणेकरीता गांवामध्ये एकी निर्माण करावी असे आवाहन आ.शंभूराज देसाईंनी केले आहे.
मनरेगा योजनेतंर्गत पाटण तालुक्यात प्रामुख्याने स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तसेच ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची कांमे पुर्णत्वाकडे नेणेकरीता आ. देसाई व रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटण तहसिल कार्यालयातील लोकनेते बाळासाहेब देसाई सभागृह प्रतिक्षालय इमारत याठिकाणी यासंदर्भातील सर्व यंत्रणांची बैठक आयोजीत करण्यात आली होती. यावेळी बैठकीस पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसिलदार रामहरी भोसले, पाटण पंचायत समितीचे सदस्य व गटनेते पंजाबराव देसाई,सदस्या सुभद्रा शिरवाडकर, बशीर खोंदू,शिवसेना उपजिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, वन विभागाचे काळे, सार्वजनीक बांधकाम विभागाचे उपअभियंता वसंत खाडे,पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता आर.एस. पाटील,कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी तुषार जाधव,नायब तहसिलदार माने,वीज वितरणचे उपअभियंता जाधव, सागरे यांच्यासह विविध गावचे सरपंच,उपसरंपच,ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविस्तार अधिकारी,ग्रामसेवक, महसूल विभागाचे मंडलाधिकारी, तलाठी यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी संजय पाटील यांनी मनरेगा योजनेतंर्गत करावयाच्या सर्व कामांची माहिती बैठकीमध्ये दिली. बैठकीमध्ये आ.देसाई यांच्या सुचनेवरून प्राधान्याने पाटण या डोंगरी तालुक्यातील स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते तसेच ग्रामीण भागात शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची कांमे मोठया प्रमाणात प्रलंबीत आहेत. ही कामे प्रामुख्याने करणे गरजेचे आहे. मनरेगा योजनेतंर्गत महसूल आणि ग्रामविस्तार अधिकारी तसेच ग्रामसेवकांचा पुढाकार महत्वाचा आहे. मनरेगा योजनेचा उपक्रम चांगला असून 60-40 प्रमाणे या योजनेतंर्गत काम करावयाचे आहे. याकरीता प्रामुख्याने गावामध्ये वाडीवस्तीमध्ये लोकांच्या सहभागाबद्दल जागृती होणे आवश्यक आहे. स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते असो वा शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांचे कांम असो याचा उपयोग गावातील वाडीवस्तीतील सर्व ग्रामस्थांनाच होत असतो त्यामुळे ग्रामस्थांनी या योजनेत सहभाग घेणे गरजेचे आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावांतील लोकांना जॉब कार्ड देवून लोकांना रोजगाराचे साधन निर्माण करणारी आणि या माध्यमातून गावाचा विकास साधणारी ही योजना शासनाने आणली आहे.पारदर्शकपणे या योजनेत काम केल्यास गावाचा विकास होण्यास कोणतीच अडचण निर्माण होणार नाही त्यामुळे गावच्या विकासाकरीता प्रथमत: गावातील गटतट पक्ष् बाजूला ठेवून गावकर्यांनी या योजनेत सहभागी व्हावे अशी आमची अपेक्षा आहे.आपण मार्च 2018 अखेर या योजनेतंर्गत पाटण तालुक्यातील 50 गावांमधील स्मशानभूमिकडे जाणारे रस्ते व शेताकडे जाणारे शिवारातील पाणंद रस्त्यांची कांमे पुर्ण करण्याचे उदिष्ट केले आहे. त्या उदिष्टानुसार लवकरच या योजनेत तालुका व गावस्तरावर काम करणार्या यंत्रणाची आणि संबधित गांवातील सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि गावकरी यांची बैठक घेवून गाववार हे काम कशाप्रकारे पुर्णत्वास नेता येईल याकरीता बैठक घेणार आहे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान काही सरंपच मंडळीनी पाण्ंद रस्त्याच्या कामांमध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न होतो त्यामध्ये महसूल विभागाने पुढाकार घेवून अशा समस्या सोडविणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले यावर आ.देसाईंनी अशाप्रकारे कोणत्या गांवामध्ये अडचणी असतील तर महसूल विभागाचे तालुक्याचे प्रमुख प्रांताधिकारी तसेच तहसिलदार यांच्या निदर्शनास ही बाब आणून दयावी ही यंत्रणा यावर योग्य ती कार्यवाही करुन मार्ग काढेल असेही त्यांनी यावेळी सुचित केले. प्रांरभी आ.शंभूराज देसाई यांचे वहया देवून स्वागत करण्यात आले.