सातारा: श्री दत्त जयंती व पौर्णिमेचे निमित्त साधून रविवार दि.3 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत उत्तरचिदंबरम नटराज मंदिरात विशेष दीपोत्सव आयोजित केला आहे.
या दिवशी संपूर्ण दिवसभर श्री नटराज मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. या कार्यक्रमांच्या सातारा शहरातील व उपनगरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री उत्तरचिदंबरम नटराज मंदिराचे विश्वस्त यांनी केले आहे.