कराड : मिडीया हे लोकशाहीचा एक महत्वपुर्ण स्तंभ असून समाजातील घटनांचा मागोवा घेताना पत्रकार हे अदृष्य शक्ती म्हणून काम करतात,मला नेहमीच सर्वच पत्रकारांचे सहकार्य असते असे प्रतिपादन कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले.
आमदार बाळासाहेब पाटील यांचा पत्रकारांशी स्नेहसंवाद हा कार्यक्रम कराड येथील हॉटेल संगममधील एचडीएफसी हॉलमध्ये आयोजीत करण्यात आला होता. यावेळी आमदार बाळासाहेब पाटील बोलत होते. कार्यक्रमास दिलीपराव जाधव,प्रा.भोसेसर उपस्थित होते.
समाजातील विविध घटनांचे वृत्तांकन करून पत्रकार एक घटना अनेकांपर्यंत पोहचवितात तर माझ्या अनेक घटनांचे पत्रकार साक्षीदार आहेत.माझ्या विकास कामांना सर्वच पत्रकार नेहमी सकारात्मक प्रसिध्दी देत असतात. लोकशाहीमध्ये मिडीयाला अनन्यसाधारण महत्व आहे. समाजाचा आरसा म्हणून वृत्तपत्र व पत्रकारांकडे पाहिले जाते असेही आमदार बाळासाहेब पाटील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले.
कै. यशवंत पाध्ये स्मृती पुरस्कार शशिकांत पाटील, विशेष दर्पण पुरस्कार गोरख तावरे, साहित्य रत्न पुरस्कार विकास भोसले,पत्रकार भूषण पुरस्कार प्रमोद सुकरे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार आकाश सोरटे, विश्व प्रेरणा नायक पुरस्कार सौ.प्रगती पिसाळ,
उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार प्रविण कांबळे यांना प्राप्त झाल्याबद्दल आणि जेष्ठ पत्रकार मुकुंद भट्ट, उदय किरपेकर व दैनिक पुण्यनगरीचे सातारा जिल्हा आवृत्ती संपादक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल प्रशांत पवार यांचा आमदार बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, बुके देवून यथोचित सत्कार करण्यात आला.
पत्रकार स्नेहसंवादच्या कार्यक्रमाचे प्रा.अशोक चव्हाण यांनी स्वागत करून शेवटी आभार मानले. यावेळी दिलीप भोपते, सचिन शिंदे, देवदास मुळे, सचिन देशमुख, विजय पाटील, रामभाऊ जगताप, आनंदराव पाटील, राजू सनदी, हैबत आडके, दिपक पाटील, महेश सुर्यवंशी, सुलतान फकीर, अजिंक्य गोवेकर, दिनकर थोरात, हेमंत पवार, सतिश चव्हाण, हरिष काळे, आनंदा थोरात, संतोष दाभाडे, नितीन ढापरे, अतुल होनकळसे, प्रशांत कारंडे, बाळकृष्ण गुरव, उमेश सुर्यवंशी, शंकर पोळ, दादासो कांबळे, आनंदराव जगदाळे, वसीम सय्यद, प्रकाश पिसाळ आदींसह सर्व वृत्तपत्र व न्यूज चॅनेलचे पत्रकार उपस्थित होते.