सातारा : क्रांतीगुरु वीर लव्हुजी वस्ताद साळवे यांच्या 23 व्या जयंतीनिमित्त खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांचेवतीने त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करणेत आले. तसेच यावेळी बालदिनानिमित्त तोफखाना समाजमंदीरातील अंगणवाडीतील बालकांना खा. उदयनराजे यांच्या हस्ते मिष्टन्न वाटप करणेत आले. सातारा नगरपरिषदेच्यावतीने वीर लव्हुजी वस्ताद यांच्या पुतळ्याचे तसेच आजूबाजूचे सुशोभीकरण करण्याचे काम सुरु केले असून सदरचे काम 50 टक्के पुर्ण झाले असून उर्वरित काम येत्या आठवडा भरात पूर्ण केले जाईल. तसेच वीर लव्हुजी वस्ताद यांचा जीवनपट याठिकाणी गौरवण्यात येईल, तसेच प्रभाग क्र. 6 मध्ये सदरचे पुतळा सुशोभीकरणाचे काम भव्य आणि उत्कृष्ट प्रतीचे व्हावे असे यावेळी खा. उदयनराजे यांनी सांगितले.
या अभिवादन कार्यक्रम प्रसंगी उपनगराध्यक्ष राजू भोसले, आरोग्य सभापती अण्णा लेवे, पाणी पुरवठा सभापती सुहास राजेशिर्के, सविता फाळके, श्रीकांत आंबेकर, यशोधन नारकर, सुनिता पवार, अंकुश भिंगारदेवे, अमर गायकवाड, जितू खानविलकर, अशोक घोरपडे, राम हादगे, प्रा. कांबळे, गोलंदाज मंडळाचे अध्यक्ष दीपक घाडगे, दीपक कुचेकर, अंकूश खुडे, श्रीरंग घाडगे, दबडे, सकटे, समाधान घाडगे, अजय बडेकर इ. मान्यवर उपस्थित होते.