रणधीर भोईटे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत स्वीकारला बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, महाराष्ट्र राज्य चेअरमन पदाचा पदभार

(फोटो – मुंबई बिल्डर असोसिएशनच्या महाराष्ट्र राज्य चेअरमन पदाचा पदभार मुंबई मुख्य कार्यालयामध्ये स्विकारताना रणधीर भोईटे,डावीकडून माजी राष्ट्रीय अध्यक्ष एम. मोहन(चेन्नई),राष्ट्रीय अध्यक्ष आर. एन. गुप्ता (दिल्ली)ट्रस्टी लालचंद शर्मा (गझीयाबाद)
उपाध्यक्ष उत्तर विभाग संजीव गोयल
सचिव प्रदीप नागवेकर मुंबई)
फलटण  – बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र अध्यक्षपदी येथील नामांकित बांधकाम व्यवसाईक रणधीर भोईटे यांची निवड बिनविरोध झाली होती.दरम्यान आज रणधीर भोईटे यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे पदभार स्वीकारला.यावेळी माजी राष्ट्रीय अध्यक्ष एम.मोहन(चेन्नई) ,राष्ट्रीय अध्यक्ष आर. एन. गुप्ता(दिल्ली)तसेच ट्रस्टी लालचंद शर्मा(गझीयाबाद)
उपाध्यक्ष उत्तर विभाग संजीव गोयल सचिव प्रदीप नागवेकर (मुंबई)उपस्थित होते.
     फलटण येथील नामांकित उद्योगपती म्हणून आपली एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रणधीर भोईटे यांना बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी निवड झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यासह फलटण चे नाव उद्योग क्षेत्रात सुवर्णाक्षरांनी लिहिले असून सर्वांना बरोबर घेऊन काम करणार असल्याचे पदभार स्वीकारताना भोईटे यांनी सांगितले.
    बिल्डर्स असोसिएशनच्या माध्यमातून येणाऱ्या काळात अडचणी सोडवून सर्वसमावेशक असे काम करण्यासाठी माझे प्रयत्न असतील तसेच जेष्ठ उद्योजकांना विश्वासात घेऊन तरुण उद्योजकांना या व्यवसायात सामावून घेण्यासाठी व त्यांची प्रगती साधली जाईल असे आश्वासन रणधीर भोईटे यांनी दिले.आज विविध मान्यवरांच्या उपस्थितीत कोरोनाचा पार्श्वभूमीवर छोटेखानी कार्यक्रमात पदभार स्वीकारला आहे.